Thursday, January 27, 2011

इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा

CBSE, ICSE यांचे अभ्यासक्रम प्रगल्भ आहेत यात शंका नाही. परंतु SSC बोर्ड खेडुत. गरीब, शिक्षणासाठी आसुसलेल्या मुलांना सामावुन घेण्यासाठी केंद्रीय बोर्डासारखा प्रगल्भ अभ्यासक्रम नाही ठेवु शकत.

त्यामुळे SSC चा अभ्यासक्रम CBSE, ICSE च्या पातळीचा बनवणे थोडं अवघड आहे. परंतु अभ्यासक्रमात बदल मात्र नक्कीच व्हायला हवेत. आता हेच बघा.. इतिहासातल्या कित्येक गोष्टी या आपण तीन वेगवेगळ्या इयत्तांमधुन शिकतो .. e.g. शिवरायांचा इतिहास. तसंच विद्न्यानाच्या बाबतीत म्हणता येइल. मला वाटतं हे टाळता येण्यासारखं आहे.

ICSE चा अभ्यासक्रम हा द्न्यानापेक्षा कौशल्यावर भर देणारा, Practicals मधुन मुलांना घडविणारा, Projects ला भरपुर मार्क असल्यामुळे मुलांच्या कल्पकतेला वाव देणारा असा आहे.

त्यात CBSE, ICSE ला दोनच भाषांचं बंधन आहे. तर SSC ला तीन भाषांचं ! त्यामुळे मार्क कमवणं तुलनेने अवघड. याउलट CBSE, ICSE ला बहुपर्यायी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न, Practicals, Projects यावर भर असल्यामुळं बदाबदा मार्क !! आणखी काही कारणे विभास ने सांगितली आहेत .. त्यामुळे मार्कस च्या बाबतीत हे लोक भरपुर पुढे असतात. आणि हेच लोक मग ११ वी, १२ वी ला SSC कडे वळतात. का ? तर SSC सोपं आहे म्हणुन ! त्यामुळे admission च्या वेळी हे यांचं घोडं पुढं दामटतात .. कारण मार्क भरपुर असतात ना १० वी ला ! आणि आपले राज्यकर्ते पण पर्सेंटाइल वगैरे प्रकार आणतात, आणखी मदतीला. भरडला जातो SSC चा विद्यार्थी ! [:x]

असो. पण यामुळे आणि स्पर्धेच्या काळात खास करुन मराठी SSC मागे पडत चालली आहे. SSC(English) ला अजुन जरा आहेत चांगले दिवस .. पण आणखी किती वर्षे कुणास ठावुक. मोठ्या शहरांमधुन CBSE, ICSE ला प्रवेश घेणा-यांची संख्या लक्षणीय रित्या वाढते आहे...मागे "बालमोहन" सुद्धा SSC च्या जागी CBSE शाळा सुरु करायचा विचार करत होती असं ऐकलं होतं. त्याचं पुढे काय झालं ठावुक नाही.

मराठी शाळा ज्या Rate ने बंद पडत चालल्या आहेत ते पाहुन वाईट वाटतं ! या टोपिकच्या माध्यमातुन याच्या कारणांवर आणि उपायांवर अधिक विचार व्हायला हवा.

1 comment:

  1. याच विषयावर माझा ब्लॉग आहे. @ vishkul.blogspot.in

    ReplyDelete