भारताच्या राज्यघटनेनुसार कलम २५ प्रमाणे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा मुलभुत अधिकार देण्यात आला आहे. धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध करण्याचं काही एक कारण नाही. पण सक्तीचे धर्मांतर, लालुच दाखवुन केलेले धर्मांतर या गोष्टी चुक आहेत, आणि या थांबायला हव्यात.
हिंदु धर्म नुसार तुम्ही एकतर जन्मत: हिंदु असता अथवा नाही. माझ्या माहिती प्रमाणे हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा असा कुठला विधी अस्तित्वात नाही आहे. असल्यास, मला त्या धर्मग्रंथांचे नाव सांगावे. मला वाचायला आवडेल. हिंदुंनी कधीही आपला धर्म कुणावर लादला नव्हता .. सध्या दुर्दैवाने असे प्रकार सुरु झाले आहेत, हा भाग निराळा. पण त्याचं कारण त्यांची असुरक्षितता हे आहे.
इस्लाम, ख्रिश्चन या धर्मात धर्मप्रसाराला मान्यता आहे. एखाद्या हिंदुने हिंदु धर्म सोडुन दुसरा धर्म स्विकारावा, असे इतर धर्मीयांना का वाटावे ? मानवसेवेच्या साठी त्याचं धर्मांतर होणं का आवश्यक आहे? तशी सुद्धा सेवा करता येतेच की ! हिंदुंमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजी आणि चीड चे ते कारण आहे.
हिंदु धर्मातल्या अस्प्रुश्यतेमुळे कित्येक हलक्या जातीच्या समजल्या जाणार्या लोकांनी हिंदु धर्म नाकारला आहे. याची कारणे ओळखुन हिंदु धर्मीयांनी सुद्धा चुकिच्या प्रथी टाळणे आवश्यक आहे. परंतु या जातीभेदामुळे पूर्ण समाजव्यवस्थाचं एवढी पोखरलेली आहे कि आज सुद्धा कित्येक दलितांना मंदिरप्रवेश नाकारला जातो. खैरलांजी सारख्या कित्येक घटना घडतच राहतात. मधु दंडवते यांच्या सारख्या माणसाकडुन कवी नामदेव ढसाळ यांना जातीय वागणुक दिली जाते.. शहरात हे प्रकार तर गावाकडं तर विचरायलाच नको !
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: २ वर्षे हिंदु धर्मपीठांकडे आपल्या मागण्या केल्या. त्या अमान्य झाल्यामुळे शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला. चुकिच्या प्रथांबद्दलचा कर्मठपणा आपल्याला सोडावा लागेल.
हिंदु संघटनांनी गरिबांसाठी जास्तीत जास्त सेवेची, शिक्षणाची सोय केली तर हे प्रकार निश्चितच थांबु शकतील. त्यानुसार संघ, रामक्रुष्ण मिशन इ. संघटना निश्चितच काम करत आहेत. इतर धर्मीयांनी सुद्धा धर्मांतर(सक्तीचे व लालुच दाखवुन) थांबवणे हे आवश्यक आहे. आणि यासंबंधात विविध धर्म परिषदांमध्ये आवाज उठवला जात आहे, आणि त्याबद्दल इतर धर्मीयांची सुद्धा धोरणे बदलत आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावे.
No comments:
Post a Comment