Monday, May 9, 2011
शंकराचार्याचा तोडगा आणि अयोध्येचा गुंता
कांची कामकोटी शंकराचार्य related articles
कांची कामकोटीच्या शंकराचार्यांची अटक
कांचीतीत शंकर मठात हिशेब व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले शंकररामन यांचा तीन सप्टेंबरला खून झाला. मठातील अनेक आथिर्क गैरव्यवहार आपण जगापुढे आणू , अशी धमकी शंकररामनने शंकराचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती तपासात बाहेर आली. दविड मुन्नेत्र कळघमने या मुद्द्यावरून जयललिता सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सरकार शंकराचार्यांना पाठीशी घालत आहे , कारण सरकार त्यांच्या हुकमानुसार चालते , असा दमुकचा आरोप होता.
शंकररामनने मठाला पाठवलेले पत्र , सुरुवातीच्या आरोपींच्या सेलफोन्सवरील संभाषण , मठाचे बँकखाते अशा सर्व अंगांनी तपास सुरू होता. दोन महिने असा चौकशी- तपासाचा घोळ चालवल्यावर अखेर गुरुवारी तामिळनाडू पोलिसांचे कमांडो पथक शंकराचार्यांना अटक करण्यासाठी खास विमानाने बंगलोरला रवाना झाले. पण शंकराचार्य तत्पूवीर्च मेहबूबनगरलारवाना झाले होते. पोलिसांनी तेथे मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांना अटक केली. त्यावेळी शंकराचार्य त्रिकाल पूजा करत होते.
त्यांना विमानाने येथे आणण्यात आले. प्रथम महानगर दंडाधिकारी जी. उत्तमराज यांनी त्यांनानेल्लोर येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हायकोर्टातही नकार
शंकराचार्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत त्यांना कोठडीत पाठवू नये , अशी विनंती त्यांचे वकील आय. सुब्रह्माण्यम यांनी मदास हायकोर्टात धाव घेऊन केली. शंकराचार्य यांना मधुमेहअसल्याने दररोज इन्शुलिन द्यावे लागते , असे त्यांनी सांगितले. मात्र हायकोर्टाचे न्या. सुब्रह्माण्यम यांनी विनंती फेटाळली. जामीनअर्जावर शनिवारी सुनावणी होईल. या काळात शंकराचार्यांना कोठडीत पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शंकराचार्यांवरील आरोप निराधार असून , त्यांना अक्षम व्यक्तींच्या साक्षींवरून अटक झाली आहे ,असा बचाव कांची मठाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांचे समाजातील स्थान आणि जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन त्यांच्यावरील खटल्याचे वार्तांकन करू देऊ नये , ही मठाची विनंतीही हायकोर्टाने फेटाळली. अयोध्या प्रकरणात हिंदू महंत आणि मुस्लिम नेत्यांमध्ये मध्यस्थीकेल्याबद्दल शंकराचार्य गेले वर्षभर चचेर्त होते.
हिंदुत्ववाद्यांचा संताप
या घटनेविषयी भाजप तसेच विश्व हिंदु परिषद व आरएसएस या हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी संताप , तर दमुकने समाधान व्यक्त केले. तर , या अटकेचा तपशील आम्ही मागवला आहे , अशी सावध प्रतिक्रिया केंद सरकारने व्यक्त केली. हिंदूंच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला ,असा संघ परिवाराचा आणि शिवसेनेचा सूर होता. अटक करण्याइतका पुरेसा पुरावा होता काय ,असा सवाल या सर्वांनी केला आहे.
Thursday, April 21, 2011
बुद्धाचा मृत्यु
बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.
अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.
पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.
दुसर्या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.
पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेलासूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.
बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचंचंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.
पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दवया शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.
कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.
Friday, April 1, 2011
श्रद्धा या विषयावर दाभोलकर आणि अभ्यंकर यांची जुगलबंदी
‘साधना’ साप्ताहिक आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या परिवर्तनवादी संस्थांनी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्या-त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना प्रोत्साहन दिले. आपला विषय मांडल्यानंतर दाभोलकर आणि अभ्यंकर यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले.
माणसाच्या संस्कृती, प्रगतीचा इतिहास म्हणजे श्रद्धा तपसाण्याचा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून पृथ्वी सूयाार्भोवती फिरते, असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला पाखंडी ठरवून एकान्तवासाची शिक्षा धर्मानेच दिली होती, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’
श्रद्धा आणि अंधश्रद्धेत १०० टक्के फरक आहे. सात्त्विक श्रद्धा हरविल्याने देशापुढे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कारण बुद्धिप्रामाण्यवादीच आहेत, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, ‘‘सगळ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या अलौकिक गोष्टींचा अनुभव प्रज्ञावंतांना आला. सर्व संतांनी श्रद्धेविषयी लेखन केले आहे. अशा प्रज्ञावंतांचे शब्दप्रामाण्य हाच ईश्वर असल्याचा पुरावा. तमोगुण, सत्त्वगुण आणि राजस गुण असलेली श्रद्धा असते. तमोगुण कमी होऊन जोवर सत्त्वगुण जागृत होत नाहीत, तोवर जगात शांतता लाभणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा, अशी आपली व्याख्या आहे. श्रद्धा जनसमुदायाची पकड घेते, असे सांगून दाभोलकर यांनी श्रद्धेला तपासणीचा न्याय लावला पाहिजे, असा आग्रह केला आणि विश्वास, अंधविश्वास यांचे सविस्तर विवेचन केले. मनुवादी व्यवस्था स्वीकारणार्या आणि वर्णव्यवस्था लादणार्या परंपरेने माणूस जन्मजात उच्च किंवा नीच असू शकतो, असे मानले आहे. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची कवचकुंडले असतात. श्रद्धेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असे ते म्हणाले.
काही गोष्टी श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. भावना हा श्रद्धेचा विषय नाही. सानेगुरुजींनीही गायत्री मंत्राचा जप केल्यास पुनर्जन्म लाभतो, असे म्हटले आहे. विज्ञान आणि आध्यात्म ही एकच आहेत. अणूपासून विश्वाची निर्मिती हे विज्ञानाने आता मान्य केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू संस्कृतीने पूर्वीच सांगितलेले आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी प्रमाण मानली, तर जगात गोंधळ उडाल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
वैज्ञानिक भाव बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. माझा विवेक हा बुद्धीचा निष्कर्ष आहे; तो देवाचा आदेश नाही, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘भावना माणसाची मालक आणि विचार नोकर असतात. कार्यकारणभाव हे माणसाचे मोठे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी परमेश्वर हेच सत्य, असे मानत. एका अनुभवाने ते सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.’’
Friday, February 25, 2011
महात्मा फुले
डावपेचात्मक ब्रिटिशप्रेम का न मानावे?
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
(सविस्तर) आजानुकर्ण
मुळातच त्यांचे विचार वा लिखान समजावून घेताना त्याला आपण सध्याच्या परिस्थितीतील मोजपट्या लावणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल! उदाहरणच द्यायचे म्हणले तर सध्याच्या काळात दोन लग्ने करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. मात्र पुर्वी हा रिवाज समाजमान्य आणी प्रचलीत होता. मग आजच्या या बदलेल्या सामाजीक मुल्यावरुन पुर्वी एकापेक्षा अधीक लग्ने केलेल्या थोर इतिहास पुरुषांना आपण
असभ्य ठरवणार आहोत का? नक्कीच नाही! कारण तात्कालीन रिवाजाप्रमाणे (परिस्थितीप्रमाणे) त्यात काही वावगे नव्हते. अगदी हाच विचार फुलेंबाबतही प्रत्येकाने केला तर बर्याचशा गोष्टी चटकन स्वच्छ होतील.
पहिल्यांदा त्यांच्या ब्रिटीश राजवटीविषयीबद्दल असणार्या आपुलकीविषयी बोलुयात.... वर उमेशच्या पोस्टप्रमाणे ब्रिटीशांनी रेल्वे, टपाल ई सेवा भारतात सुरु केल्या हे नेहमी सांगीतले जाते पण माझ्या मते तरी त्यांनी या सुविधा भारतीय लोकांसाठी नव्हे तर मुख्यत्वे त्यांचे राज्य सुरळीत चालावे म्हणून प्रशासकीय सुलभेतेसाठी केलेल्या होत्या. त्याबद्दल आपण अनुकंपा बाळगणे तेवढे योग्य होणार नाही. मात्र राजाराय मोहन रॉय सारख्या समाजसुधारकाला पाठींबा देऊन, सामाजीक विरोध डावलून कायद्याने सतीची प्रथा बंद करणे वगैरे सारख्या सामाजीक सुधारणा म्हणता येतील अशा ब्रिटीशांनी अमलात आणलेल्या गोष्टीही आपण नाकारु शकणार नाही हेही सत्य आहे.
तेव्हापर्यंत भारतीय समाजव्यवस्था ही धार्मीक पायावर उभी होती तर इंग्रज सरकारने धर्मविरहीत लिखीत कायदा आमलात आणला होता. हिंदू धर्मातील जातीभेद इतका टोकाला पोहचला होता की काही जातींना किमान माणुस असल्याची वागणूकही सवर्ण समाजाने नाकारली होती. मात्र ब्रिटीश कायद्यामध्ये या जतीभेदाला स्थान नव्हते. ज्योतीबांच्या समाजीक कार्याला ब्रिटीशांचा पाठींबा होता तर याउलट जातविरहीत समाजरचनेसाठी तळमळीने काम करणार्या फुलेंना सवर्ण व्यवस्थेकडून (पर्यायने भारतीय समाजव्यवस्थेकडून) प्रचंड विरोध पत्करावा लागत होता. अशा वेळी फुलेंचे मत ब्रिटीश राजवटीविषयी अनुकुल बनले असण्याची शक्यता न्याय्य ठरत नाही का?
शिवाय फुलेंचे जिवीतकार्य १८२७ ते १८९० पर्यंतचे आहे. त्या कालखंडात ब्रिटीशांविरुध्द सामाजीक लढा, संघर्ष अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. म्हणजे अशा स्वातंत्र्य संघर्षाला ज्योतीरावांनी विरोध करुन ब्रिटीशांबद्दल अनुकुल मत दिले आहे असेही नव्हे!
फुलेंना अस्पृश्यता निवारण, मुलींचे शिक्षण अथवा काही सामाजीक अनिष्ट प्रथा दूर करताना कर्मठ आणी सनातनी लोकांचा धर्माच्या नावाखाली झालेला विरोध सर्वश्रूत आहे! मुळातच सवर्ण व्यवस्थेने केवळ आपले वर्चस्व रहावे म्हणून धर्माच्या नावाखाली कनिष्ठ जातींना वर्षानुवर्षे दिलेली अमानवी वागणूक ही अन्यायकारक होती. आपले दुर्दैव हे की हे सगळे हिंदू धर्माच्या नावाखाली चालवले गेले. अशा वेळी धर्मातील भेद मान्य करणार्या प्रथा बदलण्यासाठी ठाम नकार देणार्या वा त्याला विरोध करणार्या व्यवस्थेमुळे हिंदू धर्माबद्दलचे मत कलुषीत होणे नक्कीच शक्य आहे. (पुढील काळात त्याची परिणीती करोडो हिंदूंनी धर्माचा त्याग करुन बौध्द धर्माचा स्विकार करण्यात झाली हे सत्य सगळ्यांनी अनुभवले. पण तो येथे चर्चेचा विषय नाही).
हिंदू धर्मातील या अनिष्ट प्रथांवर टिका लिहीणे किंवा हा भेद देवालाही मान्य आहे अशा पसरविल्या गेलेल्या भ्रामक समजुतीवर आघात करताना देवतांबद्दल लिहीले जाणे आपणही मान्य करायला हवे. हा हिंदू धर्मावर वा देवतांवर हल्ला नसून भेदाभेद मान्य करणार्या, त्याचे समर्थन करणार्या प्रथांवर, घटकांवर केलेला हल्ला आहे हा भेद आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा! सध्याचे हिंदू धर्माचे स्वरुप हे खुप बदलेले, सुधारणावादी आहे म्हणून आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे. मात्र पुर्वी अशी परिस्थिती नव्हती हे खेदाने नमूद करावे लागते आहे. त्यामुळे तात्कालीन टिकेबद्दल आकस न ठेवता ते आघात आपण सध्या सकारात्मक दृष्टीने स्विकारणेच आपल्या धर्मासाठी, समाजासाठी हिताचे आहे. म. फुलेंची टिकाही आपण अशीच स्विकारावी असे माझे मत आहे.
सारांश.. आधीच म्हणल्याप्रमाणे फुलेंच्या विचारांकडे त्या काळच्या परिस्थितीचा विचार करुन पहायला हवे. अन्यथा तो या थोर समाजसुधारकावर अन्याय ठरेल!
Thursday, February 10, 2011
Gandhi murder case judgement
Ambedkar, Savarkar and Partition
This alternative of Mr. Savarkar to Pakistan has about it a frankness, boldness and definiteness which distinguishes it from the irregularity, vagueness and indefiniteness which characterizes the Congress declarations about minority rights. Mr. Savarkar's scheme has at least the merit of telling the Muslims, thus far and no further. The Muslims know where they are with regard to the Hindu Maha Sabha. On the other hand, with the Congress the Musalmans find themselves nowhere because the Congress has been treating the Muslims and the minority question as a game in diplomacy, if not in duplicity.
At the same time, it must be said that Mr. Savarkar's attitude is illogical, if not queer. Mr. Savarkar admits that the Muslims are a separate nation. He concedes that they have a right to cultural autonomy. He allows them to have a national flag. Yet he opposes the demand of the Muslim nation for a separate national home. If he claims a national home for the Hindu nation, how can he refuse the claim of the Muslim nation for a national home?
It would not have been a matter of much concern if inconsistency was the only fault of Mr. Savarkar. But Mr. Savarkar in advocating his scheme is really creating a most dangerous situation for the safety and security of India. History records two ways as being open to a major nation to deal with a minor nation when they are citizens of the same country and are subject to the same constitution. One way is to destroy the nationality of the minor nation and to assimilate and absorb it into the major nation, so as to make one nation out of two. This is done by denying to the minor nation any right to language, religion or culture and by seeking to enforce upon it the language, religion and culture of the major nation. The other way is to divide the country and to allow the minor nation a separate, autonomous and sovereign existence, independent of the major nation. Both these ways were tried in Austria and Turkey, the second after the failure of the first.
Mr. Savarkar adopts neither of these two ways. He does not propose to suppress the Muslim nation. On the contrary he is nursing and feeding it by allowing it to retain its religion, language and culture, elements which go to sustain the soul of a nation. At the same time he does not consent to divide the country so as to allow the two nations to become separate, autonomous states, each sovereign in its own territory. He wants the Hindus and the Muslims to live as two separate nations in one country, each maintaining its own religion, language and culture. One can understand and even appreciate the wisdom of the theory of suppression of the minor nation by the major nation because the ultimate aim is to bring into being one nation. But one cannot follow what advantage a theory has which says that there must ever be two nations but that there shall be no divorce between them. One can justify this attitude only if the two nations were to live as partners in friendly intercourse with mutual respect and accord. But that is not to be, because Mr. Savarkar will not allow the Muslim nation to be co-equal in authority with the Hindu nation. He wants the Hindu nation to be the dominant nation and the Muslim nation to be the servient nation. Why Mr. Savarkar, after sowing this seed of enmity between the Hindu nation and the Muslim nation, should want that they should live under one constitution and occupy one country, is difficult to explain.
One cannot give Mr. Savarkar credit for having found a new formula. What is difficult to understand is that he should believe that his formula is the right formula. Mr. Savarkar has taken old Austria and old Turkey as his model and pattern for his scheme of Swaraj. He sees that in Austria and Turkey there lived one major nation juxtaposed to other minor nations bound by one constitution with the major nation dominating the minor nations, and argues that if this was possible in Austria and Turkey, why should it not be possible for the Hindus to do the same in India.
That Mr. Savarkar should have taken old Austria and old Turkey as his model to build upon is really very strange. Mr. Savarkar does not seem to be aware of the fact that old Austria and old Turkey are no more. Much less does he seem to know the forces which have blown up old Austria and old Turkey to bits. If Mr. Savarkar instead of studying the past—of which he is very fond—were to devote more attention to the present, he would have learnt that old Austria and old Turkey came to ruination for insisting upon maintaining the very scheme of things which Mr. Savarkar has been advising his "Hindudom" to adopt, namely, to establish a Swaraj in which there will be two nations under the mantle of one single constitution in which the major nation will be allowed to hold the minor nation in subordination to itself.
The history of the disruption of Austria, Czechoslovakia and Turkey is of the utmost importance to India and the members of the Hindu Maha Sabha will do well to peruse the same. I need say nothing here about it because I have drawn attention to lessons from their fateful history in another chapter. Suffice it to say that the scheme of Swaraj formulated by Mr. Savarkar will give the Hindus an empire over the Muslims and thereby satisfy their vanity and their pride in being an imperial race. But it can never ensure a stable and peaceful future for the Hindus, for the simple reason that the Muslims will never yield willing obedience to so dreadful an alternative.
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_partition/307a.html#part_2
Monday, February 7, 2011
ब्राम्हण अधिवेशनात नक्की काय घडले ?
Friday, February 4, 2011
गांधीहत्येमागचा मास्टरमाइंड ?
सौजन्य - मटा , २७ मे २००८
मणिशंकर अय्यर यांनी उकरून काढलेल्या वादानिमित्त महात्मा गांधींच्या हत्येतील सहभागाविषयी बरीच वादावादी झाली होती. तेव्हा ‘ आऊटलूक ’ने केलेली ‘ वीर सावरकरः द इनसाइड स्टोरी ’ ही कव्हरस्टोरी खूप गाजली होती. ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्रन यांनी नॅशनल अर्काइवजमधील रेकॉर्डसच्या आधारे घेतलेला हा शोध आम्ही मराठीत देत आहोत.
-------------------------------------------------------------------------------------------------------
यशस्वी होऊन या...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करणारा नथुराम गोडसे आणि या कटातील त्याचा साथीदार नारायण दत्तात्रय आपटे यांना मिळालेला हा आशीर्वाद.. !
आणि हा आशीर्वाद दिला होता दस्तुरखुद्द विनायक दामोदर सावरकर यांनी...
दिल्लीच्या संसद भवनापासून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर ‘ नॅशनल अर्काइवज् ऑफ इंडिया ’ ची नव्याने बांधलेली इमारत आहे. या वास्तूत अनेक गाजलेल्या खटल्यांशी संबंधित जुनीपुराणी कागदपत्रे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्यातच गांधी खून खटल्याशी संबंधित कागदपत्रेही उपलब्ध आहेत. पोलिसांनी नोंदविलेले जाबजबाब , साक्षीदारांच्या साक्षी आणि स्पेशल ब्रँचचे गोपनीय अहवाल असा सगळा दस्तावेज याठिकाणी आहे. त्यांची छाननी केल्यानंतर एक गोष्ट अगदी स्वच्छ आणि स्पष्ट दिसते ती म्हणजे गांधीजींच्या हत्येच्या कटात सावरकर यांचा असलेला सहभाग. महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे ते केवळ निकटवर्तीय नव्हते ,तर या हत्या कटात त्यांचा उघड सहभाग होता , असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या झाल्यानंतर ज्या आठ आरोपींवर खटला चालला त्यापैकी सावरकरही एक होते.
या ऐतिहासिक दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर जी माहिती मिळते ती अशी....
गोडसेचे गुरू : गांधी हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात जी सुनावणी झाली ,त्यामध्ये नथुराम गोडसे याने २८ फेब्रुवारी १९३८ रोजी सावरकरांना लिहिलेले पत्र पुराव्यासाठी सादर करण्यात आले होते. गांधीजींची हत्या करणारा गोडसे अनेक वर्षांपासून सावरकरांना ओळखत होता , हे त्यावरुन स्पष्ट होते. हिंदूराष्ट्राची उभारणी या समान विचारसरणीचा ध्यास घेतलेले सावरकर आणि गोडसे यांचे संबंध गुरू-शिष्य असे होते.
सावरकर हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर गोडसेने त्यांना हे सविस्तर पत्र पाठवले होते. त्या पत्राचा आशय असा होता - “ रत्नागिरीतून तुमची सुटका झाल्यापासून सर्वांच्या मनात धगधगते अग्नीकुंड पेटले आहे. हिंदुस्थान हे केवळ हिंदूंसाठीच असावे ,अशी मनापासून इच्छा बाळगणा-यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे. हिंदूमहासभेचे अध्यक्षपद स्वीकारताना आपण जे भाषण केले , ते ऐकल्यानंतर आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे फारसे अवघड राहिलेले नाही , याची खात्री पटते. ” आपण एक राष्ट्रीय स्वयंसेवक आर्मी स्थापन केली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५० हजार कार्यकर्ते त्यासाठी सज्ज आहेत , असा उल्लेखही त्या पत्रात आहे. हिंदूंच्या हितरक्षणासाठी लढणारांना सावरकरांनी मार्गदर्शन केले पाहिजे , अशी गोडसेची इच्छा होती.
तत्कालिन बॉम्बे प्रांताच्या स्पेशल ब्रँचचे पोलिस उपायुक्त जमशेद नगरवाला यांनी गांधी हत्या कटाचा तपास केला होता. आपल्या अहवालात नगरवाला म्हणतात की , “सावरकरांची राजकीय विचारसरणी गोडसेने १९३५ सालापासूनच अंगिकारली होती. गोडसेने १९३० साली रत्नागिरीत रा. स्व. संघाची शाखा उघडली होती. ”
गोडसेंची सावरकरांवर एवढी भक्ती होती की , आपल्या वर्तमानपत्राच्या मास्टहेडमध्ये (शीर्षस्थानी) त्याने सावरकरांचा फोटो छापला होता. हिंदूराष्ट्र प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या अग्रणी नावाच्या वृत्तपत्राचा गोडसे संपादक , तर सह आरोपी नारायण आपटे हा मॅनेजर होता. सावरकरांनी दिलेल्या १५ हजार रुपयांच्या भांडवलावरच हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले होते.
सावरकरांचा सहकारी गोडसे : गोडसेने सावरकरांसोबत बराच काळ एकत्र काम केले होते. १९४६ साली त्याने सावरकरांना लिहिलेल्या पत्रावरून त्यांचे हे संबंध स्पष्ट होतात. दिल्लीचे शेठ जुगल किशोर बिर्ला यांच्याकडून सावरकरांना एक हजार रुपयांचा चेक मिळाला. तो चेक सावरकरांनी गोडसेला दिला. या व्यवहाराची माहिती त्या पत्रात नमूद करण्यात आली आहे.
पोलिस रेकॉर्डनुसार , गोडसे आणि आपटे सावरकरांचे एवढे जवळचे होते की ,अनेकदा ते दोघे त्यांच्यासोबत प्रवास करत. गांधी हत्येच्या पाच महिने आधी , ऑगस्ट १९४७ मध्ये त्यांनी सावरकरांसोबत शेवटचा प्रवास केला होता. गांधी हत्येच्या कटात आपला हात असल्याचा सावरकरांनी निक्षून इन्कार केला असला तरी , ते गोडसेचा नेहमीच आदरार्थी उल्लेख करीत राहिले. त्यांनी पोलिसांना ज्या जबान्या दिल्या आणि कोर्टात सुनावणीच्या वेळी साक्षी दिल्या तेव्हा गोडसेचा उल्लेख पंडित नथुराम असा आदराने केला.
गांधी हत्या कटाची माहिती सावरकरांना होती : डीसीपी नगरवाला यांच्या क्राइम रिपोर्टमध्ये बॉम्बे प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. महात्मा गांधींवर २० जानेवारीला झालेल्या पहिल्या हल्ल्याची तपशीलवार माहिती देसाई यांनी नगरवालांना दिली होती. ‘ मला गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली की , महात्मा गांधींवर २० जानेवारी १९४८ रोजी जो प्राणघातक हल्ला झाला. त्यामध्ये मदनलाल , त्याचा सहकारी करकरे आणि इतरांचा हात होता. दिल्लीत गांधीजींवर हल्ला करण्यापूर्वी मदनलाल आणि करकरे यांनी सावरकरांची भेट घेतली होती ’, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली , असा उल्लेख नगरवालांच्या अहवालात आहे.
सावरकरांना गांधी हत्या कटाची संपूर्ण माहिती होती , अशी माहिती नगरवालांना मिळाली होती. आपल्या रिपोर्टमध्ये ते नमूद करतात - ‘ सावरकरांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधी हत्येचा कट आखण्यात आला होता , अशी माहिती माझ्या सूत्रांनी मला दिली. मी आजारी आहे आणि राजकारणाशी माझा संबंध उरलेला नाही , असा सावरकरांनी घेतलेला पवित्रा ढोंग आहे.... त्यामुळेच सावरकरांच्या राहत्या घरावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ’
गांधी हत्येचा कट आखणा-यांमध्ये सावरकरांच्या विचारसरणीला मानणा-यांचा तसेच नाराज शीख विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे नगरवाला यांनी अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदू राष्ट्र दल या संघटनेचे लोक सावरकरांना मानणारे आहेत. त्यांची आणि नाराज शीख कार्यकर्त्यांची एक गुप्त बैठकही झाली होती. स्वतः सावरकर यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीत गोडसे , आपटे आणि इतर गांधी हत्या कटातील आरोपी हिंदू राष्ट्र दलाचे कार्यकर्ते होते , अशी कबुली दिली होती.
गांधी हत्या कटात सावरकरांची भूमिका : महात्मा गांधींवर २० जानेवारी रोजी मदनलाल पाहवा नावाच्या पंजाबी निर्वासिताने पहिला प्राणघातक हल्ला केला. नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींच्या प्रार्थनेनंतर त्याने स्फोट घडवला. त्याला तत्काळ अटक करण्यात आली. मदनलालला ओळखणारे मुंबईच्या रुईया कॉलेजचे डॉ. जगदीश चंद्र जैन यांनी दुस-याच दिवशी सायंकाळी ४ वाजता बॉम्बे प्रांताचे तत्कालीन पंतप्रधान बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. खेर यांनी गृहमंत्री मोरारजी देसाई यांनाही बोलावून घेतले. ‘ मी त्यांच्या रुममध्ये गेलो. माननीय पंतप्रधानांनी डॉ. जैन नावाच्या व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली. वृत्तपत्रामध्ये त्या व्यक्तीने स्फोटाची बातमी वाचली , तो स्फोट घडविणा-या मदनलाल नावाच्या माणसालाही आपण ओळखतो , मला त्या व्यक्तीची चांगली माहिती आहे आणि ती द्यायची आहे , असे डॉ. जैन यांनी सांगितले... ’ असे मोरारजींच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे.
मोरारजींच्या जबानीनुसार , जैन यांना त्या कटाची संपूर्ण माहिती होती. ‘ मदनलाल आणि त्याच्या काही मित्रांनी जैन यांना सांगितले होते की , ते एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करणार आहेत. तो नेता म्हणजे महात्मा गांधी असल्याचे मदनलालने जैन यांना सांगितले होते... अहमदनगरला त्याच्यासोबत काम करणा-या करकरे नावाच्या मित्राची मदनलालने ओळख करुन दिली.... मदनलालने पुढे सांगितले की ,करकरे त्याला घेऊन सावरकरांना भेटायला गेला होता. जवळपास दोन तासांहून अधिक काळ त्यांच्यात चर्चा झाली. मदनलाल जे काही करत आहेत , त्याबद्दल सावरकरांनी त्याला शाबासकीही दिली. त्यांनी मदनलालची पाठ थोपटली आणि मोहिम फत्ते करा , असे सांगितले. ’
बडगेंची महत्त्वपूर्ण जबानी : नगरवालांनी या प्रकरणाचा तपास करताना दिगंबर रामचंद्र बडगे नावाच्या माणसाला अटक केली. या बडगेनेच गोडसेला स्फोटके दिली होती. गोडसेने ती मदनलालला दिली. नंतर बडगे माफीचा साक्षीदार बनला आणि सरकारी पक्षाचा मुख्य साक्षीदार झाला. गांधी हत्या कटात सावरकरांचा कसा सहभाग होता , याची धक्कादायक वस्तुस्थिती बडगेने कोर्टात साक्ष देताना सांगितली.
बडगे हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. छोट्या शस्त्रांचा तो व्यापार करत असे. ९ जानेवारी रोजी आपटे आणि मदनलाल त्याच्याकडे गेले आणि त्यांनी गट कॉटन स्लॅबची (स्फोटक) मागणी बडगेकडे केली. दुस-या दिवशी आपटे बडगेला घेऊन दलाच्या कार्यालयात गोडसेला भेटायला गेला. दोन गन कॉटन स्लॅबस् , पाच हातबॉम्ब आणि दोन रिवॉल्वर्सची ऑर्डर बडगेला देण्यात आली. त्यासाठी पाहिजे ती किंमत देण्याचे आश्वासन गोडसेने दिले. मात्र ही शस्त्रसामुग्री बडगेने मुंबईत पोहोचती करायची , अशी अट घालण्यात आली. हिंदू महासभेच्या दादरच्या ऑफिसमध्ये आपटेला १४ जानेवारीला ती डिलिवरी हवी होती. बडगेने हत्येमागचा हेतूही पोलिसांना सांगितला. ‘ आपटेने मला विचारले की , आमच्यासोबत दिल्लीला यायची तुझी तयारी आहे का ? मी कशासाठी , अशी विचारणा केली. तेव्हा आपटे म्हणाला की , ‘ तात्याराव ’ म्हणजे सावरकरांनी गांधीजी आणि जवाहरलाल नेहरु यांना संपविण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे काम त्यांनी माझ्याकडे सोपविले आहे. ’
बडगे १७ जानेवारीला पुन्हा सावरकर सदनात गेला. ‘ तेव्हा गोडसे म्हणाला की ,आपण सगळ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी तात्यारावांचे शेवटचे दर्शन घेतले पाहिजे. आपटे, गोडसे , शंकर आणि मी टॅक्सीत बसलो आणि शिवाजी पार्कला सावरकर सदनाच्या दिशेने निघालो. मुख्य जंक्शनवरच टॅक्सी थांबवण्यात आली. आम्ही चौघे खाली उतरलो आणि समोरच्या बोळातून चालत सावरकर सदनात जाऊन पोहोचलो. जंक्शनपासून ती दुसरी बिल्डिंग होती. मला खालीच थांबायला सांगण्यात आले. आप्पा कासार आणि दामले तिथे होते. आपटे आणि गोडसे सावरकरांच्या दर्शनासाठी वर गेले. पाच किंवा दहा मिनिटांनी ते खाली उतरले. सावरकरही त्यांच्यापाठोपाठ खाली आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. यशस्वी होऊन या... ’
सावरकर सदनातून परतताना आपटे बडगेला म्हणाला , ‘ गांधीजींची शंभरी भरली आहे , असे तात्यारावांचे भाकित आहे. ’ आपटेचे हे वाक्य आणि सावरकरांचे माझ्या कानांनी ऐकलेले आशीर्वाद यावरुन माझी खात्री पटली की , जे काही घडले त्याला तात्यारावांची मान्यता होती आणि त्यांचा त्यास आशीर्वादही होता. ’ गोडसे आणि आपटे दिल्लीला गेले. बडगे आणि शंकर दिल्लीला १९ जानेवारीला जाऊन पोहोचले. त्याठिकाणी हिंदू महासभेच्या कार्यालयात गोपाळ गोडसे , करकरे आणि मदनलाल यांना भेटलो.
गन कॉटन स्लॅब पेटवायचा , त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण करायची आणि नंतर हातबॉम्ब फेकायचे , असा कट आखण्यात आला होता. मदनलालने स्फोटके पेटवली ,परंतु बडगे आणि त्याच्यासोबत असलेल्या शंकरला हातबॉम्ब फेकता आले नाहीत. त्यामुळे हा कट फसला. खरं तर अनोळखी व्यक्तींच्या हातून हे काम करुन घेण्याचा आपटे आणि गोडसेचा खरा हेतू होता. मात्र तो फसल्याने शेवटी आपटे आणि गोडसेलाच हे काम स्वतः उरकावे लागले.
सावरकरांची निर्दोष मुक्तता का झाली ? : न्यायमूर्ती आत्मा चरण यांच्या कोर्टात जो खटला चालला , त्यात सर्व आठ आरोपींवर पहिला आरोप होता तो त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचल्याचा. उल्लेखनीय बाब म्हणजे , सावरकरांचा अपवाद वगळता अन्य सर्व आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले. तर बडगेने दिलेले साक्षीपुरावे तपासून घेण्यासाठी अन्य कोणताही पुरावा नसल्याच्या तांत्रिक मुद्यावरुन सावरकरांची मात्र कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
तरीही , बडगे हा विश्वासू साक्षीदार असल्याचे कोर्टाचे मत होते. २० जुलै ते ३० जुलै १९४८ असे जवळपास दहा दिवस त्याची साक्ष आणि उलट तपासणी कोर्टात झाली. “बडगेने त्याला असलेली सगळी माहिती परखडपणे कोर्टात सांगितली. उलट तपासणीतही त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली , कोणत्याही प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला नाही. ” परंतु तरीही न्या. आत्मा चरण यांनी सावरकरांना दोषी ठरवले नाही. कारण सरकारी बाजूने सर्व भिस्त बडगेच्या साक्षी पुराव्यावरच बेतलेली होती.
गांधी हत्या कटातील दोन्ही प्रमुख आरोपी सावरकर सदनात गेले होते , हे तर जगजाहीरच होते. तत्कालिन ख्यातनाम अभिनेत्री शांताबाई मोडक यांनीही साक्ष देताना , गोडसे आणि आपटे आपणाला पुणे एक्स्प्रेसमध्ये भेटले. १४ जानेवारीला त्यांना मी सावरकर सदनाजवळ सोडले , अशी माहिती दिली. १७ जानेवारीला आपटे आणि गोडसे शिवाजी पार्कला सावरकर सदनाजवळ माझ्या टॅक्सीतून उतरले , अशी साक्ष टॅक्सीचालक ऐतप्पा कोटियन यानेही दिली.
“ सावरकरांची गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याच्या कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला सरकारी पक्षाने हायकोर्टात आव्हान दिले नाही. त्यामुळे हायकोर्टात हे प्रकरण कधीच रिओपन झाले नाही ,” असे मत शिमला हायकोर्टाचे न्या. जी. डी. खोसला यांनी व्यक्त केले आहे. खोसला यांनी साक्षीदार बडगेचे कौतुक केले. “ बडगेने त्याच्याकडे असलेली संपूर्ण माहिती तपशीलवार कोर्टात सांगितली. माझे असे मत आहे की , त्याने सांगितलेली सगळी माहिती सकृतदर्शनी खरी वाटते ,” अशी पुस्तीही न्या. खोसला यांनी जोडली.
कपूर आयोगाचा निष्कर्ष : गांधी हत्येनंतर तब्बल वीस वर्षानंतर न्या. जीवन लाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली गांधी हत्येच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्यात आला. बडगेने दिलेली साक्ष ही सावरकरांचे अंगरक्षक आप्पा रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या जबानीशी सुसंगत आहे , असे मत न्या. कपूर आयोगाने नोंदविले. परंतु न्या. कपूर आयोगाचा निष्कर्ष असा होता की , “ सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मिळालेली माहिती तुटक तुटक अवस्थेत आहे. सावरकर आणि त्यांच्या ग्रुपने हत्येचा कट आखल्याचे त्यावरुन स्पष्ट होत नाही. ”
(अनुवाद - आऊटलुक , ६ सप्टेंबर २००४ मधील लेखाचा)
Sunday, January 30, 2011
प्रवास 'विचारसरणी'च्या प्रारंभाचा
युरोपमधील पुनरुत्थानाच्या (रेनेसाँ) आणि प्रबोधनाच्या (एनलायटन्मेंट) चळवळीने युरोपातच नव्हे तर मानवी इतिहासात आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. माणूस जन्मत: स्वतंत्र असतो आणि स्वतंत्रता हेच त्याचे सत्त्व आहे. सारी माणसे जन्मत: समान आहेत. माणूस हा प्राय: विचारक्षम (रॅशनल) आणि म्हणूनच विवेकक्षम प्राणी आहे ही प्रबोधनकाळाची मुख्य शिकवण होती. यातूनच स्वातंत्र्य, समता, विवेकवाद या मूल्यांचा उदय झाला. या मूल्यांमुळे माणसाची स्वत:कडे पहाण्याची, निसर्गाकडे आणि समाजाकडे पहाण्याची जीवनदृष्टीच बदलली. ही जीवनदृष्टी सरंजामशाहीकालीन पारंपरिक व मध्ययुगीन जीवनदृष्टीपेक्षा खूपच आगळीवेगळी होती. मध्ययुगीन, पारंपरिक समाजव्यवस्थांमध्ये समता हे मूल्य नव्हते. सारी मानवी नाती ही वरिष्ठ आणि कनिष्ठतेच्या तत्त्वावर आधारित होती. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, गुरु-शिष्य, मालक-नोकर, जमीनदार-भूदास, राजा-प्रजा ही नाती बरोबरीच्या, समानतेच्या तत्त्वावर आधारित नव्हती. ती वरिष्ठांप्रतीच्या नि:सीम निष्ठेवर आधारित होती. काही माणसे जन्माने श्रेष्ठच असतात, जन्मजात गुणसंपन्न असतात आणि त्यांच्या धुरिणत्वाखाली सर्वसामान्यांनी आपले समाजजीवन जगण्यातच सर्वांचेच भले असते अशी पारंपरिक समाजाची धारणा होती. आजही स्वातंत्र्य, समता, बंधुता इ. प्रबोधनकालीन मूल्ये ज्या समाजघटकांपर्यंत पोहोचली नाहीत, अशा मंडळींना 'समता' अस्वाभाविक वाटते. स्वातंत्र्याचे मूल्य निरर्थक वाटते. प्रबोधनकालीन मूल्यांनी माणसाच्या या पारंपरिक धारणांना छेद दिला. माणूस विचारक्षम असल्याने त्याला त्याचे हित-अहित समजू शकते म्हणूनच त्याला विचाराचे, निर्णयाचे, निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असा आग्रह प्रबोधनकालीन विचारवंतांनी, वैज्ञानिकांनी, तत्त्वचितकांनी धरला. या स्वातंत्र्याच्या आग्रहामुळेच समाजातील धर्मगुरु, राजा, सरंजामी वतनदार, सरदार वर्ग यांच्या निरंकुश सत्तेला हादरे बसले. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स या देशांत लोकसत्ताक क्रांत्या झाल्या. आपली समाजरचना, राजकीय संस्था व व्यवस्था माणूस स्वत:च्या संकल्पानुसार बनवू, घडवू शकतो हा विश्वास माणसात निर्माण झाला. निसर्ग हा नियमबद्ध असून, निसर्गाचे नियम समजू शकतात आणि ते मानवी बुद्धीच्या कक्षेत आहेत हे विज्ञानाने स्पष्ट केले. त्याच न्यायाने सामाजिक जीवनाची गतितत्त्वे, समाजव्यवस्थांची धारक तत्त्वे विचाराच्या सहाय्याने, निरीक्षणातून समजू शकतात याचाही साक्षात्कार माणसाला झाला. साहजिकच सर्व सामाजिक, राजकीय, संस्था या मानवनिर्मित असून, माणसानेच स्वत:च्या हितापोटी त्या निर्माण केल्या आहेत, त्यात बिघाड झाल्यास तो दूर करण्याची क्षमताही माणसात आहे, किबहुना एक विचारक्षम जीवमात्र म्हणून ती त्याची जबाबदारी आहे ही धारणा प्रबोधनाने माणसाच्या ठायी निर्माण केली. हाच तो प्रबोधनकालीन बुद्धिवाद. हा बुद्धिप्रामाण्यवाद आधारभूत मानून सन १७९५ मध्ये अंतोनी दि त्रेसी या विख्यात विचारवंताने 'इन्स्तित्यूत दि फ्रान्स' ही संस्था विचार शास्त्राचा (सायन्स ऑफ आयडियाज) पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुरू केली व तो त्याचा प्रमुखही बनला. या विचार शास्त्राला दि त्रेसीने 'आयडिऑलाॅजी' असा शब्दप्रयोग वापरला. आयडिऑलाॅजीच्या सहाय्याने माणसाची विचार-प्रक्रिया कशी चालते हे समजू शकेल. मानवी मनात विचार, कल्पना कशा तयार होतात हे समजले तर मानवी वर्तनाचा व कृतीचा नेमका अर्थ समजेल, त्याविषयीचे खरे ज्ञान माणसाला प्राप्त होईल व या ज्ञानाच्या आधारेच माणूस आपल्याला हव्या असलेल्या समाज व्यवस्थांची निर्मिती सहज करू शकेल व त्यातून त्याचे समाजजीवन सुखकर होईल हा प्रबोधनकालीन आशावाद दि स्त्रेसीच्या आयडियालाॅजी च्या मुळाशी होता. नंतरच्या काळात आयडियालाॅजी या शब्दाला अगदीच वेगळा अर्थ प्राप्त झाला हा भाग वेगळा. फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यावर त्याच्या अधिकारशाहीमुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सशक्तपणे निर्माण झालेल्या लोकशाहीच्या धारणा व बुद्धिप्रामाण्यवादास खीळ बसली. नेपोलियनने पद्धतशीरपणे अंतोनी दि त्रेसी व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रतिपादिलेल्या बुद्धिप्रामाण्याचा, विचार शास्त्राचा उपहास केला व अंतिमत: त्यांनी स्थापलेली इन्स्टिट्यूज दि फ्रान्स ही संस्थाही मोडीत काढली. दि त्रेसीच्या मूळ कल्पनेप्रमाणे, विचार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झालेली आयडियॉलाॅजी प्राणीशास्त्राची ज्ञानशाखा म्हणून विकसित होण्याऐवजी ती राजकीय व्यवस्थेचे धारक तत्त्व आणि विश्वदर्शनाची चौकट म्हणून पुढे विकसित झाली. यातूनच आज ज्याला आपण 'राजकीय विचारप्रणाली' (आयडिऑलाॅजी) म्हणतो त्या राजकीय विचारसरणीचे युग अवतरले. 'राष्ट्रवाद', 'उदारमतवाद', 'व्यक्तिस्वातंत्र्यवाद', 'कॉन्झर्व्हेटिझम', 'समाजवाद', 'भांडवलवाद', 'अराज्यवाद', 'साम्यवाद', 'फॅसिझम' अशा कितीतरी विचारधारा परस्परांशी संघर्ष करीत, ऐकमेकांशी टकराव घेत निर्माण झाल्या व त्यांनी आपली राजकीय दृष्टी व जीवनदृष्टी घडविली. आपल्याला जाणीव असो वा नसो; पण राजकीय व्यवस्थांचे, राजकारणाचे, समाजातील विविध वर्गांचे आणि घटकांचे आपले आकलन हेच मुळी राजकीय विचारसरणींनी निर्धारित होत असते. झालेले असते. दलित, आदिवासींना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतची नाराजी व्यक्त करताना बरेच जण त्यांना 'सरकारी जावई' असे उपहासाने म्हणतात तेव्हा ते ब्राह्यण्यवादाची विचारसरणी बोलत असतात. हे त्यांना दरवेळेस समजतेच असे नाही. म्हणूनच 'आम्ही जातबित मानत नाही' असे म्हणतानाच व स्पर्शास्पर्शाच्या व्यवहारापुरती जात मुक्त झालेली मंडळी 'लग्ने शक्यतो जातीअंतर्गतच असलेली बरी', किवा 'आरक्षणाचे फारच स्त्रोत माजलंय बुआ' अशी परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसतात. किवा अनेक दलित मंडळी सरसकट सर्व ब्राह्यणांना व उच्च जातींना 'मनुवादी' ठरवतात तेव्हा ते डॉ. आंबेडकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वज्ञानापेक्षा आंबेडकरवादी विचारसरणीच बोलत असतात हेही त्यांना बऱ्याचदा समजत नसते. 'सारे मुसलमान दहशतवादी नसतात पण दहशतवादी असलेले सारे मुसलमानच असतात' असा एस.एम.एस. करणारी मंडळी हिदुत्वावादाचे वाहक असतात. तात्पर्य काय तर आपली राजकीय मते, दृष्टीकोन, राजकारणाचे आकलन हे सारेच विचारसरणीमुलक (आयडॉलाॅजिकल) असते, इतकी राजकीय विचारसरणी आपल्या कळत न कळत आपल्या विचारांचा व जाणीवांचा ताबा घेत असते. म्हणूनच विविध विचारसरणींचा परिचय करून घेण्याआधी राजकीय विचारसरणी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक विचारसणीची ताकद आणि मर्यादा समजू शकेल. तसेच विचारसरणीचे राजकारणातील व समाजकारणातील महत्त्व समजू शकेल. अन्यथा 'शेंडी राखणारे आणि घंटा वाजवणारे हिदुत्व आम्हाला नकोय' किवा 'आमचे एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' या विधानांचा अर्थबोध होणार नाही. तसेच 'बहुजनवाद ते सर्वजनवाद' हा राजकीय प्रवास समजणार नाही. - प्रा. डॉ. यशवंत सुमंत (yashwantsumant06&yahoo.com ) लोकमत मंथन ३० जाने २०११ मधून साभार. |