Sunday, January 30, 2011

प्रवास 'विचारसरणी'च्या प्रारंभाचा


युरोपमधील पुनरुत्थानाच्या (रेनेसाँ) आणि प्रबोधनाच्या (एनलायटन्मेंट) चळवळीने युरोपातच नव्हे तर मानवी इतिहासात आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. माणूस जन्मत: स्वतंत्र असतो आणि स्वतंत्रता हेच त्याचे सत्त्व आहे. सारी माणसे जन्मत: समान आहेत. माणूस हा प्राय: विचारक्षम (रॅशनल) आणि म्हणूनच विवेकक्षम प्राणी आहे ही प्रबोधनकाळाची मुख्य शिकवण होती. यातूनच स्वातंत्र्य, समता, विवेकवाद या मूल्यांचा उदय झाला. या मूल्यांमुळे माणसाची स्वत:कडे पहाण्याची, निसर्गाकडे आणि समाजाकडे पहाण्याची जीवनदृष्टीच बदलली. ही जीवनदृष्टी सरंजामशाहीकालीन पारंपरिक व मध्ययुगीन जीवनदृष्टीपेक्षा खूपच आगळीवेगळी होती. मध्ययुगीन, पारंपरिक समाजव्यवस्थांमध्ये समता हे मूल्य नव्हते. सारी मानवी नाती ही वरिष्ठ आणि कनिष्ठतेच्या तत्त्वावर आधारित होती. स्त्री-पुरुष, पती-पत्नी, गुरु-शिष्य, मालक-नोकर, जमीनदार-भूदास, राजा-प्रजा ही नाती बरोबरीच्या, समानतेच्या तत्त्वावर आधारित नव्हती. ती वरिष्ठांप्रतीच्या नि:सीम निष्ठेवर आधारित होती. काही माणसे जन्माने श्रेष्ठच असतात, जन्मजात गुणसंपन्न असतात आणि त्यांच्या धुरिणत्वाखाली सर्वसामान्यांनी आपले समाजजीवन जगण्यातच सर्वांचेच भले असते अशी पारंपरिक समाजाची धारणा होती. आजही स्वातंत्र्य, समता, बंधुता इ. प्रबोधनकालीन मूल्ये ज्या समाजघटकांपर्यंत पोहोचली नाहीत, अशा मंडळींना 'समता' अस्वाभाविक वाटते. स्वातंत्र्याचे मूल्य निरर्थक वाटते.
प्रबोधनकालीन मूल्यांनी माणसाच्या या पारंपरिक धारणांना छेद दिला. माणूस विचारक्षम असल्याने त्याला त्याचे हित-अहित समजू शकते म्हणूनच त्याला विचाराचे, निर्णयाचे, निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असा आग्रह प्रबोधनकालीन विचारवंतांनी, वैज्ञानिकांनी, तत्त्वचितकांनी धरला. या स्वातंत्र्याच्या आग्रहामुळेच समाजातील धर्मगुरु, राजा, सरंजामी वतनदार, सरदार वर्ग यांच्या निरंकुश सत्तेला हादरे बसले. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स या देशांत लोकसत्ताक क्रांत्या झाल्या. आपली समाजरचना, राजकीय संस्था व व्यवस्था माणूस स्वत:च्या संकल्पानुसार बनवू, घडवू शकतो हा विश्वास माणसात निर्माण झाला. निसर्ग हा नियमबद्ध असून, निसर्गाचे नियम समजू शकतात आणि ते मानवी बुद्धीच्या कक्षेत आहेत हे विज्ञानाने स्पष्ट केले. त्याच न्यायाने सामाजिक जीवनाची गतितत्त्वे, समाजव्यवस्थांची धारक तत्त्वे विचाराच्या सहाय्याने, निरीक्षणातून समजू शकतात याचाही साक्षात्कार माणसाला झाला. साहजिकच सर्व सामाजिक, राजकीय, संस्था या मानवनिर्मित असून, माणसानेच स्वत:च्या हितापोटी त्या निर्माण केल्या आहेत, त्यात बिघाड झाल्यास तो दूर करण्याची क्षमताही माणसात आहे, किबहुना एक विचारक्षम जीवमात्र म्हणून ती त्याची जबाबदारी आहे ही धारणा प्रबोधनाने माणसाच्या ठायी निर्माण केली. हाच तो प्रबोधनकालीन बुद्धिवाद.
हा बुद्धिप्रामाण्यवाद आधारभूत मानून सन १७९५ मध्ये अंतोनी दि त्रेसी या विख्यात विचारवंताने 'इन्स्तित्यूत दि फ्रान्स' ही संस्था विचार शास्त्राचा (सायन्स ऑफ आयडियाज) पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुरू केली व तो त्याचा प्रमुखही बनला. या विचार शास्त्राला दि त्रेसीने 'आयडिऑलाॅजी' असा शब्दप्रयोग वापरला. आयडिऑलाॅजीच्या सहाय्याने माणसाची विचार-प्रक्रिया कशी चालते हे समजू शकेल. मानवी मनात विचार, कल्पना कशा तयार होतात हे समजले तर मानवी वर्तनाचा व कृतीचा नेमका अर्थ समजेल, त्याविषयीचे खरे ज्ञान माणसाला प्राप्त होईल व या ज्ञानाच्या आधारेच माणूस आपल्याला हव्या असलेल्या समाज व्यवस्थांची निर्मिती सहज करू शकेल व त्यातून त्याचे समाजजीवन सुखकर होईल हा प्रबोधनकालीन आशावाद दि स्त्रेसीच्या आयडियालाॅजी च्या मुळाशी होता. नंतरच्या काळात आयडियालाॅजी या शब्दाला अगदीच वेगळा अर्थ प्राप्त झाला हा भाग वेगळा. फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यावर त्याच्या अधिकारशाहीमुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सशक्तपणे निर्माण झालेल्या लोकशाहीच्या धारणा व बुद्धिप्रामाण्यवादास खीळ बसली. नेपोलियनने पद्धतशीरपणे अंतोनी दि त्रेसी व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रतिपादिलेल्या बुद्धिप्रामाण्याचा, विचार शास्त्राचा उपहास केला व अंतिमत: त्यांनी स्थापलेली इन्स्टिट्यूज दि फ्रान्स ही संस्थाही मोडीत काढली.
दि त्रेसीच्या मूळ कल्पनेप्रमाणे, विचार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झालेली आयडियॉलाॅजी प्राणीशास्त्राची ज्ञानशाखा म्हणून विकसित होण्याऐवजी ती राजकीय व्यवस्थेचे धारक तत्त्व आणि विश्वदर्शनाची चौकट म्हणून पुढे विकसित झाली. यातूनच आज ज्याला आपण 'राजकीय विचारप्रणाली' (आयडिऑलाॅजी) म्हणतो त्या राजकीय विचारसरणीचे युग अवतरले. 'राष्ट्रवाद', 'उदारमतवाद', 'व्यक्तिस्वातंत्र्यवाद', 'कॉन्झर्व्हेटिझम', 'समाजवाद', 'भांडवलवाद', 'अराज्यवाद', 'साम्यवाद', 'फॅसिझम' अशा कितीतरी विचारधारा परस्परांशी संघर्ष करीत, ऐकमेकांशी टकराव घेत निर्माण झाल्या व त्यांनी आपली राजकीय दृष्टी व जीवनदृष्टी घडविली.
आपल्याला जाणीव असो वा नसो; पण राजकीय व्यवस्थांचे, राजकारणाचे, समाजातील विविध वर्गांचे आणि घटकांचे आपले आकलन हेच मुळी राजकीय विचारसरणींनी निर्धारित होत असते. झालेले असते. दलित, आदिवासींना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतची नाराजी व्यक्त करताना बरेच जण त्यांना 'सरकारी जावई' असे उपहासाने म्हणतात तेव्हा ते ब्राह्यण्यवादाची विचारसरणी बोलत असतात. हे त्यांना दरवेळेस समजतेच असे नाही. म्हणूनच 'आम्ही जातबित मानत नाही' असे म्हणतानाच व स्पर्शास्पर्शाच्या व्यवहारापुरती जात मुक्त झालेली मंडळी 'लग्ने शक्यतो जातीअंतर्गतच असलेली बरी', किवा 'आरक्षणाचे फारच स्त्रोत माजलंय बुआ' अशी परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसतात. किवा अनेक दलित मंडळी सरसकट सर्व ब्राह्यणांना व उच्च जातींना 'मनुवादी' ठरवतात तेव्हा ते डॉ. आंबेडकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वज्ञानापेक्षा आंबेडकरवादी विचारसरणीच बोलत असतात हेही त्यांना बऱ्याचदा समजत नसते. 'सारे मुसलमान दहशतवादी नसतात पण दहशतवादी असलेले सारे मुसलमानच असतात' असा एस.एम.एस. करणारी मंडळी हिदुत्वावादाचे वाहक असतात.
तात्पर्य काय तर आपली राजकीय मते, दृष्टीकोन, राजकारणाचे आकलन हे सारेच विचारसरणीमुलक (आयडॉलाॅजिकल) असते, इतकी राजकीय विचारसरणी आपल्या कळत न कळत आपल्या विचारांचा व जाणीवांचा ताबा घेत असते. म्हणूनच विविध विचारसरणींचा परिचय करून घेण्याआधी राजकीय विचारसरणी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. तरच प्रत्येक विचारसणीची ताकद आणि मर्यादा समजू शकेल. तसेच विचारसरणीचे राजकारणातील व समाजकारणातील महत्त्व समजू शकेल. अन्यथा 'शेंडी राखणारे आणि घंटा वाजवणारे हिदुत्व आम्हाला नकोय' किवा 'आमचे एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' या विधानांचा अर्थबोध होणार नाही. तसेच 'बहुजनवाद ते सर्वजनवाद' हा राजकीय प्रवास समजणार नाही.
- प्रा. डॉ. यशवंत सुमंत
(yashwantsumant06&yahoo.com )

लोकमत मंथन ३० जाने २०११ मधून साभार.

Thursday, January 27, 2011

संघ, गांधीहत्या आणि सरदार पटेल

गांधीहत्येत संघाचा हात नाही, हे दाखवुन देण्यासाठी संघाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरुंना लिहिलेल्या एका पत्राच्या काही प्रती पत्रकारांना वाटल्या होत्या. सरदार पटेलांनी हे पत्र २० फेब्रुवरी १९४८ रोजी लिहिलं होतं. गांधीहत्येच्या चौकशीदरम्यान आलेल्या पुराव्यानुसार गांधीहत्येत संघाचा हात नाही, असं या पत्रात लिहिलं आहे.
.
[blue]"it clearly emerges from these statements [made by various people during investigations] that the RSS was not involved in it at all." [/blue]
.
परंतु खरा प्रोब्लेम तर पुढे आहे. [b]सरदार पटेलांचं हेच पत्र गांधीहत्येत सावरकरांचा हात होता, असं म्हणतं. [/b]
.
[blue]"It was a fanatical wing of the Hindu Mahasabha directly under Savarkar that [hatched] the conspiracy and saw it through."
.
[red]याचा अर्थ गांधीहत्येत सावरकरांचा हात होता, असं संघाला वाटतं का ? [/red]
.
पुढे या पत्रात असंही म्हटलंय की, संघ आणि हिंदु महासभा मधील लोकांनी गांधीहत्येचं स्वागतच केलं.

[blue]The letter also states that the Mahatma's assassination "was welcomed by those of the RSS and the [Hindu] Mahasabha who were strongly opposed to his way of thinking and to his policy ... the RSS has undoubtedly other sins and crimes to answer for, but not for this one." [/blue]
.
http://outlookindia.com/submain1.asp?mode=25&refer=29701&refa=&dissum=&rcount=11

भाजपा ची अणुकराराच्या भुमिकेवरुन पलटी ?

अणुकराराच्या मुद्द्यावरुन रान उठवणा-या भाजपाने आज आपली भुमिका काहीशी बदललेली दिसते.

एनडीए सत्तेत आल्यास, यूपीएने स्वाक्षरी केलेल्या अणुकराराकडे सहजपणे कानाडोळा करता येणार नाही, असे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले असल्याने, अणुकरारावरून नाके मुरडणाऱ्या आणि विरोधाचे नारे देणाऱ्या भाजपच्या विरोधाची धार काहीशी बोथट झाल्याचे दिसते.

NDA सत्तेत आल्यास US बरोबर अणुकरार Re-Negotiate केला जाइल, असं पुर्वी यशवंत सिन्हा यांनी म्हटलं होतं. आणि आता अडवानी म्हणत आहेत की, "agreements signed by previous government cannot be disregarded easily". [:d]

यशवंत सिन्हा म्हणाले होते, "NDA अणुकरार re-negotiate करेल".
.
याच बद्दल अडवाणींना विचारले तर ते म्हणतात की, "I will not like to say anything at this point. I will leave it to the government to take a decision."
.
"How we deal with the Indo-US nuclear treaty is a matter which can be considered (when) in the government," he said".
.
अश्या दुटप्पी भुमिका का ?

संदर्भ - म टा आणि The Statesman

कुपोषणाची काही कारणे

गरिबी हेच सार्वतिक कुपोषणाचे पहिले आणि मुळ कारण आहे. आणखी काही कारणे -

१. बाळाचे जन्मवजन कमी असणे - याचे कारण अल्पवयातील लग्ने आणि मातांचे कुपोषण !
२. स्वच्छता नसल्यामुळे जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव.
३. आरोग्यसेवांचा अभाव !

त्याचबरोबर काही आर्थिक-सामाजिक कारणे सुद्धा आड येतात. बाळाला लवकर स्तनपान न देणे, स्तनपानाची चुकीची पद्धत, सार्वजनिक अस्वच्छता आणि त्यामुळचे जंतुसंसर्ग. नाजुक दुधपित्या-रांगत्या काळातच बाळे जास्त कुपोषित होतात.

वंदे मातरम आणि मुसलमान

भारतभुमीला या गीतात दुर्गेची उपमा दिली आहे, याला मुस्लिमांचा विरोध होता. त्याच बरोबर हे ज्या पुस्तकातुन घेण्यात आले आहे, ते पुस्तक ’आनंदमठ’ हे मुस्लिम विरोधी आहे अशी मुस्लिमांची धारणा आहे.
.
In his letter to Subhash Chandra Bose (1937) Rabindranath wrote,
.
"The core of Vande Mataram is a hymn to goddess Durga: this is so plain that there can be no debate about it. Of course Bankimchandra does show Durga to be inseparably united with Bengal in the end, but no Mussulman [Muslim] can be expected patriotically to worship the ten-handed deity as 'Swadesh' [the nation]. This year many of the special [Durga] Puja numbers of our magazines have quoted verses from Vande Mataram - proof that the editors take the song to be a hymn to Durga. The novel Anandamath is a work of literature, and so the song is appropriate in it. But Parliament is a place of union for all religious groups, and there the song cannot be appropriate. When Bengali Mussalmans show signs of stubborn fanaticism, we regard these as intolerable. When we too copy them and make unreasonable demands, it will be self-defeating."
.
या वादामुळेच या गीताच्या पहिल्या कडव्यालाच फ़क्त राष्ट्रीय गीताची मान्यता आहे.. पुर्ण वंदे मातरम ला नाही.
.
२००६ मध्ये हा वाद पुन्हा उफ़ाळुन आला होता. त्यावेळी वंदे मातरम हे शाळांमधुन अनिवार्य केले जावे, असा भाजप व काही इतर पक्षांचा आग्रह होता. स्वत: वाजपेयी यांनी वंदे मातरम गाणं अनिवार्य नसावं अशी भुमिका मांडली होती.
.
वंदे मातरम च्या पहिल्या दोन कडव्यांना विरोध नसुन ते गायले जावे, असा फ़तवा सुद्धा काढला गेला होता. (Ref - http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1964371.cms)

स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येसंदर्भात

स्वामी लक्ष्मणानंदजी यांच्या हत्येची जबाबदारी सब्यसाची पांडा आणि त्यांच्या संघटनेने घेतली आहे. एका लेखातील माहितीनुसार स्वामीजींवर हत्येअगोदर ५६ केसेस registered होत्या. १९८६-८७ साली त्यांच्या नेत्रुत्वाखाली १६ चर्च जाळण्यात आले असा त्यांच्यावर आरोप होता. स्वामीजी सक्तीने ख्रिश्चनांचे हिंदु धर्मात धर्मांतर घडवुन आणत आहेत, अशी या माओवाद्यांची धारणा होती. यांत तथ्य किती हे मला ठावुक नाही, पण ही शक्यता नाकारतासुद्धा येत नाही. बाकी याच माओवाद्यांनी त्यांना यापुर्वी धमक्या दिल्या होत्या हे खरं आहे. इतरही १४ जणांना त्यांनी याच संदर्भात धमक्या दिल्या आहेत.
.
अधिक माहितीसाठी ही बातमी वाचा - http://www.rediff.com/news/2008/oct/05orissa.htm

गांधी-नेहरु आणि शिवाजी misguided patriot

गांधी-नेहरुंनी शिवरायांना Misguided PATRIOT असं म्हणुन संबोधलं होतं..

गांधींनी सर्वप्रथम ही term वापरली Young India मधल्या एका प्रकाशनात १९२५ साली. "My Friend, The Revolutionary" या शिर्षकाच्या लेखात. त्यासाठीचं त्यांचं स्पष्टीकरण इथे वाचु शकता - http://www.gandhiserve.org/cwmg/VOL031.PDF (Page no 141-142)

नेहरुंनी Discovery of India लिहिलं १९४२-१९४६ या काळात तुरुंगात असताना. त्याच्या पहिल्या आव्रुत्तीत(१९४६) हा उल्लेख होता. त्यावर नेहरुंनी हे सर यदुनाथ सरकार या इतिहासकाराच्या लिखानावरुन संदर्भ घेउन तसं लिहिलं असं स्पष्टीकरण दिलं.

यावर १९५७ मध्ये नेहरुंनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आपली चुक मान्य केली.

इंदिरा गांधी यांनी पुढे या पुस्तकाच्या पुढच्या सर्व प्रकाशनांतुन तो भाग वगळला.

इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा

CBSE, ICSE यांचे अभ्यासक्रम प्रगल्भ आहेत यात शंका नाही. परंतु SSC बोर्ड खेडुत. गरीब, शिक्षणासाठी आसुसलेल्या मुलांना सामावुन घेण्यासाठी केंद्रीय बोर्डासारखा प्रगल्भ अभ्यासक्रम नाही ठेवु शकत.

त्यामुळे SSC चा अभ्यासक्रम CBSE, ICSE च्या पातळीचा बनवणे थोडं अवघड आहे. परंतु अभ्यासक्रमात बदल मात्र नक्कीच व्हायला हवेत. आता हेच बघा.. इतिहासातल्या कित्येक गोष्टी या आपण तीन वेगवेगळ्या इयत्तांमधुन शिकतो .. e.g. शिवरायांचा इतिहास. तसंच विद्न्यानाच्या बाबतीत म्हणता येइल. मला वाटतं हे टाळता येण्यासारखं आहे.

ICSE चा अभ्यासक्रम हा द्न्यानापेक्षा कौशल्यावर भर देणारा, Practicals मधुन मुलांना घडविणारा, Projects ला भरपुर मार्क असल्यामुळे मुलांच्या कल्पकतेला वाव देणारा असा आहे.

त्यात CBSE, ICSE ला दोनच भाषांचं बंधन आहे. तर SSC ला तीन भाषांचं ! त्यामुळे मार्क कमवणं तुलनेने अवघड. याउलट CBSE, ICSE ला बहुपर्यायी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न, Practicals, Projects यावर भर असल्यामुळं बदाबदा मार्क !! आणखी काही कारणे विभास ने सांगितली आहेत .. त्यामुळे मार्कस च्या बाबतीत हे लोक भरपुर पुढे असतात. आणि हेच लोक मग ११ वी, १२ वी ला SSC कडे वळतात. का ? तर SSC सोपं आहे म्हणुन ! त्यामुळे admission च्या वेळी हे यांचं घोडं पुढं दामटतात .. कारण मार्क भरपुर असतात ना १० वी ला ! आणि आपले राज्यकर्ते पण पर्सेंटाइल वगैरे प्रकार आणतात, आणखी मदतीला. भरडला जातो SSC चा विद्यार्थी ! [:x]

असो. पण यामुळे आणि स्पर्धेच्या काळात खास करुन मराठी SSC मागे पडत चालली आहे. SSC(English) ला अजुन जरा आहेत चांगले दिवस .. पण आणखी किती वर्षे कुणास ठावुक. मोठ्या शहरांमधुन CBSE, ICSE ला प्रवेश घेणा-यांची संख्या लक्षणीय रित्या वाढते आहे...मागे "बालमोहन" सुद्धा SSC च्या जागी CBSE शाळा सुरु करायचा विचार करत होती असं ऐकलं होतं. त्याचं पुढे काय झालं ठावुक नाही.

मराठी शाळा ज्या Rate ने बंद पडत चालल्या आहेत ते पाहुन वाईट वाटतं ! या टोपिकच्या माध्यमातुन याच्या कारणांवर आणि उपायांवर अधिक विचार व्हायला हवा.

हज अनुदान आणि इस्लाम

हज अनुदान हा प्रकार इस्लाम आणि शरयत च्या नुसार योग्य नाही. पाकिस्तान मध्ये १९९७ पर्यंत हज अनुदान दिले जायचे. पण तेच शरयत च्या विरोधात आहे, हे समजल्या नंतर ते बंद करण्यात आलं आहे. सौदी अरेबिया मध्ये सुद्धा असंच. हज अनुदान न देण्याने काही फ़रक पडायला नको. पण ते आजच्या राजकिय पक्षांची गरज आहे. त्यामुळे बंद होइल असं वाटत नाही.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा - http://www.loksatta.com/daily/20040114/vishesh.htm

हिंदू धर्म, आंबेडकर आणि आपण

भारताच्या राज्यघटनेनुसार कलम २५ प्रमाणे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा मुलभुत अधिकार देण्यात आला आहे. धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध करण्याचं काही एक कारण नाही. पण सक्तीचे धर्मांतर, लालुच दाखवुन केलेले धर्मांतर या गोष्टी चुक आहेत, आणि या थांबायला हव्यात.

हिंदु धर्म नुसार तुम्ही एकतर जन्मत: हिंदु असता अथवा नाही. माझ्या माहिती प्रमाणे हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा असा कुठला विधी अस्तित्वात नाही आहे. असल्यास, मला त्या धर्मग्रंथांचे नाव सांगावे. मला वाचायला आवडेल. हिंदुंनी कधीही आपला धर्म कुणावर लादला नव्हता .. सध्या दुर्दैवाने असे प्रकार सुरु झाले आहेत, हा भाग निराळा. पण त्याचं कारण त्यांची असुरक्षितता हे आहे.

इस्लाम, ख्रिश्चन या धर्मात धर्मप्रसाराला मान्यता आहे. एखाद्या हिंदुने हिंदु धर्म सोडुन दुसरा धर्म स्विकारावा, असे इतर धर्मीयांना का वाटावे ? मानवसेवेच्या साठी त्याचं धर्मांतर होणं का आवश्यक आहे? तशी सुद्धा सेवा करता येतेच की ! हिंदुंमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजी आणि चीड चे ते कारण आहे.

हिंदु धर्मातल्या अस्प्रुश्यतेमुळे कित्येक हलक्या जातीच्या समजल्या जाणार्या लोकांनी हिंदु धर्म नाकारला आहे. याची कारणे ओळखुन हिंदु धर्मीयांनी सुद्धा चुकिच्या प्रथी टाळणे आवश्यक आहे. परंतु या जातीभेदामुळे पूर्ण समाजव्यवस्थाचं एवढी पोखरलेली आहे कि आज सुद्धा कित्येक दलितांना मंदिरप्रवेश नाकारला जातो. खैरलांजी सारख्या कित्येक घटना घडतच राहतात. मधु दंडवते यांच्या सारख्या माणसाकडुन कवी नामदेव ढसाळ यांना जातीय वागणुक दिली जाते.. शहरात हे प्रकार तर गावाकडं तर विचरायलाच नको !

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: २ वर्षे हिंदु धर्मपीठांकडे आपल्या मागण्या केल्या. त्या अमान्य झाल्यामुळे शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला. चुकिच्या प्रथांबद्दलचा कर्मठपणा आपल्याला सोडावा लागेल.

हिंदु संघटनांनी गरिबांसाठी जास्तीत जास्त सेवेची, शिक्षणाची सोय केली तर हे प्रकार निश्चितच थांबु शकतील. त्यानुसार संघ, रामक्रुष्ण मिशन इ. संघटना निश्चितच काम करत आहेत. इतर धर्मीयांनी सुद्धा धर्मांतर(सक्तीचे व लालुच दाखवुन) थांबवणे हे आवश्यक आहे. आणि यासंबंधात विविध धर्म परिषदांमध्ये आवाज उठवला जात आहे, आणि त्याबद्दल इतर धर्मीयांची सुद्धा धोरणे बदलत आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्यावे.