Monday, May 9, 2011
शंकराचार्याचा तोडगा आणि अयोध्येचा गुंता
कांची कामकोटी शंकराचार्य related articles
कांची कामकोटीच्या शंकराचार्यांची अटक
कांचीतीत शंकर मठात हिशेब व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले शंकररामन यांचा तीन सप्टेंबरला खून झाला. मठातील अनेक आथिर्क गैरव्यवहार आपण जगापुढे आणू , अशी धमकी शंकररामनने शंकराचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती तपासात बाहेर आली. दविड मुन्नेत्र कळघमने या मुद्द्यावरून जयललिता सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सरकार शंकराचार्यांना पाठीशी घालत आहे , कारण सरकार त्यांच्या हुकमानुसार चालते , असा दमुकचा आरोप होता.
शंकररामनने मठाला पाठवलेले पत्र , सुरुवातीच्या आरोपींच्या सेलफोन्सवरील संभाषण , मठाचे बँकखाते अशा सर्व अंगांनी तपास सुरू होता. दोन महिने असा चौकशी- तपासाचा घोळ चालवल्यावर अखेर गुरुवारी तामिळनाडू पोलिसांचे कमांडो पथक शंकराचार्यांना अटक करण्यासाठी खास विमानाने बंगलोरला रवाना झाले. पण शंकराचार्य तत्पूवीर्च मेहबूबनगरलारवाना झाले होते. पोलिसांनी तेथे मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांना अटक केली. त्यावेळी शंकराचार्य त्रिकाल पूजा करत होते.
त्यांना विमानाने येथे आणण्यात आले. प्रथम महानगर दंडाधिकारी जी. उत्तमराज यांनी त्यांनानेल्लोर येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हायकोर्टातही नकार
शंकराचार्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत त्यांना कोठडीत पाठवू नये , अशी विनंती त्यांचे वकील आय. सुब्रह्माण्यम यांनी मदास हायकोर्टात धाव घेऊन केली. शंकराचार्य यांना मधुमेहअसल्याने दररोज इन्शुलिन द्यावे लागते , असे त्यांनी सांगितले. मात्र हायकोर्टाचे न्या. सुब्रह्माण्यम यांनी विनंती फेटाळली. जामीनअर्जावर शनिवारी सुनावणी होईल. या काळात शंकराचार्यांना कोठडीत पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शंकराचार्यांवरील आरोप निराधार असून , त्यांना अक्षम व्यक्तींच्या साक्षींवरून अटक झाली आहे ,असा बचाव कांची मठाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांचे समाजातील स्थान आणि जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन त्यांच्यावरील खटल्याचे वार्तांकन करू देऊ नये , ही मठाची विनंतीही हायकोर्टाने फेटाळली. अयोध्या प्रकरणात हिंदू महंत आणि मुस्लिम नेत्यांमध्ये मध्यस्थीकेल्याबद्दल शंकराचार्य गेले वर्षभर चचेर्त होते.
हिंदुत्ववाद्यांचा संताप
या घटनेविषयी भाजप तसेच विश्व हिंदु परिषद व आरएसएस या हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी संताप , तर दमुकने समाधान व्यक्त केले. तर , या अटकेचा तपशील आम्ही मागवला आहे , अशी सावध प्रतिक्रिया केंद सरकारने व्यक्त केली. हिंदूंच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला ,असा संघ परिवाराचा आणि शिवसेनेचा सूर होता. अटक करण्याइतका पुरेसा पुरावा होता काय ,असा सवाल या सर्वांनी केला आहे.
Thursday, April 21, 2011
बुद्धाचा मृत्यु
बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.
अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.
पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.
दुसर्या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.
पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेलासूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.
बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचंचंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.
पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दवया शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.
कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.
Friday, April 1, 2011
श्रद्धा या विषयावर दाभोलकर आणि अभ्यंकर यांची जुगलबंदी
‘साधना’ साप्ताहिक आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या परिवर्तनवादी संस्थांनी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्या-त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना प्रोत्साहन दिले. आपला विषय मांडल्यानंतर दाभोलकर आणि अभ्यंकर यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले.
माणसाच्या संस्कृती, प्रगतीचा इतिहास म्हणजे श्रद्धा तपसाण्याचा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून पृथ्वी सूयाार्भोवती फिरते, असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला पाखंडी ठरवून एकान्तवासाची शिक्षा धर्मानेच दिली होती, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’
श्रद्धा आणि अंधश्रद्धेत १०० टक्के फरक आहे. सात्त्विक श्रद्धा हरविल्याने देशापुढे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कारण बुद्धिप्रामाण्यवादीच आहेत, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, ‘‘सगळ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या अलौकिक गोष्टींचा अनुभव प्रज्ञावंतांना आला. सर्व संतांनी श्रद्धेविषयी लेखन केले आहे. अशा प्रज्ञावंतांचे शब्दप्रामाण्य हाच ईश्वर असल्याचा पुरावा. तमोगुण, सत्त्वगुण आणि राजस गुण असलेली श्रद्धा असते. तमोगुण कमी होऊन जोवर सत्त्वगुण जागृत होत नाहीत, तोवर जगात शांतता लाभणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा, अशी आपली व्याख्या आहे. श्रद्धा जनसमुदायाची पकड घेते, असे सांगून दाभोलकर यांनी श्रद्धेला तपासणीचा न्याय लावला पाहिजे, असा आग्रह केला आणि विश्वास, अंधविश्वास यांचे सविस्तर विवेचन केले. मनुवादी व्यवस्था स्वीकारणार्या आणि वर्णव्यवस्था लादणार्या परंपरेने माणूस जन्मजात उच्च किंवा नीच असू शकतो, असे मानले आहे. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची कवचकुंडले असतात. श्रद्धेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असे ते म्हणाले.
काही गोष्टी श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. भावना हा श्रद्धेचा विषय नाही. सानेगुरुजींनीही गायत्री मंत्राचा जप केल्यास पुनर्जन्म लाभतो, असे म्हटले आहे. विज्ञान आणि आध्यात्म ही एकच आहेत. अणूपासून विश्वाची निर्मिती हे विज्ञानाने आता मान्य केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू संस्कृतीने पूर्वीच सांगितलेले आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी प्रमाण मानली, तर जगात गोंधळ उडाल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
वैज्ञानिक भाव बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. माझा विवेक हा बुद्धीचा निष्कर्ष आहे; तो देवाचा आदेश नाही, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘भावना माणसाची मालक आणि विचार नोकर असतात. कार्यकारणभाव हे माणसाचे मोठे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी परमेश्वर हेच सत्य, असे मानत. एका अनुभवाने ते सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.’’
Friday, February 25, 2011
महात्मा फुले
डावपेचात्मक ब्रिटिशप्रेम का न मानावे?
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
(सविस्तर) आजानुकर्ण
मुळातच त्यांचे विचार वा लिखान समजावून घेताना त्याला आपण सध्याच्या परिस्थितीतील मोजपट्या लावणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल! उदाहरणच द्यायचे म्हणले तर सध्याच्या काळात दोन लग्ने करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. मात्र पुर्वी हा रिवाज समाजमान्य आणी प्रचलीत होता. मग आजच्या या बदलेल्या सामाजीक मुल्यावरुन पुर्वी एकापेक्षा अधीक लग्ने केलेल्या थोर इतिहास पुरुषांना आपण
असभ्य ठरवणार आहोत का? नक्कीच नाही! कारण तात्कालीन रिवाजाप्रमाणे (परिस्थितीप्रमाणे) त्यात काही वावगे नव्हते. अगदी हाच विचार फुलेंबाबतही प्रत्येकाने केला तर बर्याचशा गोष्टी चटकन स्वच्छ होतील.
पहिल्यांदा त्यांच्या ब्रिटीश राजवटीविषयीबद्दल असणार्या आपुलकीविषयी बोलुयात.... वर उमेशच्या पोस्टप्रमाणे ब्रिटीशांनी रेल्वे, टपाल ई सेवा भारतात सुरु केल्या हे नेहमी सांगीतले जाते पण माझ्या मते तरी त्यांनी या सुविधा भारतीय लोकांसाठी नव्हे तर मुख्यत्वे त्यांचे राज्य सुरळीत चालावे म्हणून प्रशासकीय सुलभेतेसाठी केलेल्या होत्या. त्याबद्दल आपण अनुकंपा बाळगणे तेवढे योग्य होणार नाही. मात्र राजाराय मोहन रॉय सारख्या समाजसुधारकाला पाठींबा देऊन, सामाजीक विरोध डावलून कायद्याने सतीची प्रथा बंद करणे वगैरे सारख्या सामाजीक सुधारणा म्हणता येतील अशा ब्रिटीशांनी अमलात आणलेल्या गोष्टीही आपण नाकारु शकणार नाही हेही सत्य आहे.
तेव्हापर्यंत भारतीय समाजव्यवस्था ही धार्मीक पायावर उभी होती तर इंग्रज सरकारने धर्मविरहीत लिखीत कायदा आमलात आणला होता. हिंदू धर्मातील जातीभेद इतका टोकाला पोहचला होता की काही जातींना किमान माणुस असल्याची वागणूकही सवर्ण समाजाने नाकारली होती. मात्र ब्रिटीश कायद्यामध्ये या जतीभेदाला स्थान नव्हते. ज्योतीबांच्या समाजीक कार्याला ब्रिटीशांचा पाठींबा होता तर याउलट जातविरहीत समाजरचनेसाठी तळमळीने काम करणार्या फुलेंना सवर्ण व्यवस्थेकडून (पर्यायने भारतीय समाजव्यवस्थेकडून) प्रचंड विरोध पत्करावा लागत होता. अशा वेळी फुलेंचे मत ब्रिटीश राजवटीविषयी अनुकुल बनले असण्याची शक्यता न्याय्य ठरत नाही का?
शिवाय फुलेंचे जिवीतकार्य १८२७ ते १८९० पर्यंतचे आहे. त्या कालखंडात ब्रिटीशांविरुध्द सामाजीक लढा, संघर्ष अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. म्हणजे अशा स्वातंत्र्य संघर्षाला ज्योतीरावांनी विरोध करुन ब्रिटीशांबद्दल अनुकुल मत दिले आहे असेही नव्हे!
फुलेंना अस्पृश्यता निवारण, मुलींचे शिक्षण अथवा काही सामाजीक अनिष्ट प्रथा दूर करताना कर्मठ आणी सनातनी लोकांचा धर्माच्या नावाखाली झालेला विरोध सर्वश्रूत आहे! मुळातच सवर्ण व्यवस्थेने केवळ आपले वर्चस्व रहावे म्हणून धर्माच्या नावाखाली कनिष्ठ जातींना वर्षानुवर्षे दिलेली अमानवी वागणूक ही अन्यायकारक होती. आपले दुर्दैव हे की हे सगळे हिंदू धर्माच्या नावाखाली चालवले गेले. अशा वेळी धर्मातील भेद मान्य करणार्या प्रथा बदलण्यासाठी ठाम नकार देणार्या वा त्याला विरोध करणार्या व्यवस्थेमुळे हिंदू धर्माबद्दलचे मत कलुषीत होणे नक्कीच शक्य आहे. (पुढील काळात त्याची परिणीती करोडो हिंदूंनी धर्माचा त्याग करुन बौध्द धर्माचा स्विकार करण्यात झाली हे सत्य सगळ्यांनी अनुभवले. पण तो येथे चर्चेचा विषय नाही).
हिंदू धर्मातील या अनिष्ट प्रथांवर टिका लिहीणे किंवा हा भेद देवालाही मान्य आहे अशा पसरविल्या गेलेल्या भ्रामक समजुतीवर आघात करताना देवतांबद्दल लिहीले जाणे आपणही मान्य करायला हवे. हा हिंदू धर्मावर वा देवतांवर हल्ला नसून भेदाभेद मान्य करणार्या, त्याचे समर्थन करणार्या प्रथांवर, घटकांवर केलेला हल्ला आहे हा भेद आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा! सध्याचे हिंदू धर्माचे स्वरुप हे खुप बदलेले, सुधारणावादी आहे म्हणून आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे. मात्र पुर्वी अशी परिस्थिती नव्हती हे खेदाने नमूद करावे लागते आहे. त्यामुळे तात्कालीन टिकेबद्दल आकस न ठेवता ते आघात आपण सध्या सकारात्मक दृष्टीने स्विकारणेच आपल्या धर्मासाठी, समाजासाठी हिताचे आहे. म. फुलेंची टिकाही आपण अशीच स्विकारावी असे माझे मत आहे.
सारांश.. आधीच म्हणल्याप्रमाणे फुलेंच्या विचारांकडे त्या काळच्या परिस्थितीचा विचार करुन पहायला हवे. अन्यथा तो या थोर समाजसुधारकावर अन्याय ठरेल!