जन गण मन हे गीत गुरुदेव टागोर यांनी पंचम जॉर्ज च्या स्वागतासाठी लिहिले अशा धादांत खोटा प्रचार करणाऱ्या पोस्ट आणि लेख सध्या वॉट्स अप आणि फेसबुक वर दिसतात. एवढेच नव्हेतर त्यावरून चक्क गुरुदेवांच्या देशभक्तीवर शंका घेतली जाते. या बाबतची वस्तुस्थिती अशी कि , हे गीत डिसेंबर १९११ मध्ये लिहिले गेले . याच वर्षी पंचम जॉर्ज यांची भारत भेट ठरलेली होती . कलकत्ता इथे २६ डिसेंबर १९११ रोजी कॉंग्रेस चे अधिवेशन होते ,त्याच्या दुस- या दिवशी हे गीत गायले गेले. ब्रिटीश वर्तमान पत्रांनी पंचम जॉर्ज ला खुश कारण्यासाठी चुकीची बातमी छापली आणि हे गीत पंचम जॉर्ज च्या स्वागतासाठी लिहिली गेले अशी अफवा सर्व कॉमन वेल्थ देशात पसरवली . वास्तविक रामभूज चौधरी यांनी हिंदी भाषेत लिहिलेले " बादशहा हमारा " हे गीत पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी लिहिले होते . २८ डिसेंबर १९११ रोजी अमृत बाजार पत्रिका मधील बातमी अशी आहे ...
"The proceedings of the Congress party session started with a prayer in Bengali to praise God (song of benediction). This was followed by a resolution expressing loyalty to King George V. Then another song was sung welcoming King George V." (Amrita Bazar Patrika, Dec.28,1911)
याशिवाय "दि बेंगाली" या वर्तमानपत्रातील बातमी अशी आहे ..
"The annual session of Congress began by singing a song composed by the great Bengali poet Ravindranath Tagore. Then a resolution expressing loyalty to King George V was passed. A song paying a heartfelt homage to King George V was then sung by a group of boys and girls." (The Bengalee, Dec. 28, 1911)
याचा अर्थ असा कि ,त्या दिवशी दोन गीते म्हटली गेली होती . एक ईश्वर स्तुती करणारे टागोरांचे आणि ठराव पारित झाल्यानंतर पंचम जॉर्ज च्या सन्मानार्थ एक ! अशी दोन गीते म्हटली गेली .
कॉंग्रेस अधिवेशनाचा अहवाल सुद्धा याच बाबीचा दुजोरा देतो ....
"On the first day of 28th annual session of the Congress, proceedings started after singing Vande Mataram. On the second day the work began after singing a patriotic song by Babu Ravindranath Tagore. Messages from well wishers were then read and a resolution was passed expressing loyalty to King George V. Afterwards the song composed for welcoming King George V and Queen Mary was sung."
गुरुदेवाच्या देशभक्तीवर शंका घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे . टागोरांना त्यांच्या रचनेबद्दल अशी अफवा पसरवली गेल्याचे आणि त्याबद्दल वस्तुस्थिती काय अशी विचारणा कांही लोकांनी १९३७ मध्ये विचारली . यावेळी टागोरांनी १० नोव्हेंबर १९३७ रोजी पुलीन बिहारी सेन यांना पत्र लिहून अधिनायक म्हणजे प्रत्येक भारतीयाची भाग्यदेवता आहे ,इतर कोणीही नाही असे निक्षून सांगितले याच पत्रात ते म्हणतात " That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George " याचा अर्थ स्पष्ट आहे ,भारताचा भाग्य विधाता पंचमच काय पण कोणताच जॉर्ज होवू शकत नाही. असे स्पष्टपणे सांगणारे गुरूदेव रविंद्रनाथ प्रखर देशभक्त होते ,हे सांगायची आवशकता या देशात निर्माण होते ,ही बाब खूप दुर्दैवाची आहे . त्यांनी १९१९ साली जालियानवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'नाईटहूड' हा किताब सरकारला परत दिला.
गुरूदेव रविंद्रनाथ टागोर जगाचा सांकृतिक वारसा आहेत, त्यांचे मोठेपण आपल्या मेंदूच्या विचारशक्तीच्या क्षमतेबाहेरचे आहे . मनातील किल्मिष बाजूला ठेवले आणि स्वत: चा खुजेपणा स्वत:च समजून घेतला तर सत्य सहज समजू शकते आणि थोरांचा मोठेपणा देखील उमगतो !
- राज कुलकर्णी .
No comments:
Post a Comment