Friday, March 9, 2012

एका गांधी टोपीचा प्रवास

" कधी एखादा हिंदुत्ववादीही यायचा. हे लोक हिंसावादी असल्याचा आव आणीत. तोंडाने भगतसिंग, सावरकर पृभूतीची तारीफ करीत. परंतु त्यांचे हाथ पिस्तुलाशी न जुळता, account generalचे office, post, railway, revenue dept असल्या सरकारी चाकरीत लेखणी घासण्यात गुंतलेले असायचे.

गांधीजींच्या चळवळीत फार मोठ्या प्रमाणात बहुजनसमाज आला होता. हजारोंच्या संख्येने बायका सत्याग्रहात शिरून तुरुंगात चालल्या होत्या. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या सर्व थरातले हे चैतन्य महत्वाचे वाटत नव्हते. या मंडळीत एक विलक्षण नतद्रष्टेपणा असायचा. राजकीय चळवळ म्हणजे एक व्यासपीठ, दोन खुर्च्या, मग अध्यक्षाचे फर्डे भाषण, आभार हीच या लोकांची कल्पना होती. वाचावीरच स्वराज्य मिळवून देयील. फार तर कुणीतरी ५-१५ bomb वगैरे फेकावे.( स्वतःचा मुलगा मात्र नसावा. त्याला कुठेतरी चिटकवून द्यायची तयारी चाललेली असायची.)

वेळोवेळी इतिहासाच्या पूर्वदिव्यात घुसायच-असली काहीतरी चमत्कारिक वृत्ती असलेली हि माणसे! त्यात काही मंडळी " काय म्हणतोय तुमचा गांधी?" अस विचारून " एकून सारा पोरखेळ चाललाय" असा शेरा मारून जायचे. बाबू गेनू नावाच्या एका मजुराने परदेशी कापडाची लॉरी पुढे जावू देणार नाही या निर्धाराने स्वतःला त्या खाली चिरडून घेतले होते. हि असली उदाहरणे डोळ्यापुढे घडत असतानाही, हि चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचलेली आहे याची जाणीव या गांधी द्वेषाने अंध झालेल्या मंडळीना येत नव्हती.

गांधीजीचा मुसलमानधार्जीनेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांच्या नीषेधापेक्षा, मुसलमान गुंडांनी केलेल्या अत्याचारांच्या वेळी त्यांच्या लेखणीला आणि वाणीला विशेष धार चढे. बरे, हिंदू-मुस्लीम दंगलीत कधी हि मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणाव तर तेही नव्हत.

हे येरू वगळले तर त्या काळी, आम्हा अनेकांच्या आयुष्याचे कर्णधार महात्मा गांधी होते.


---------- पु ल देशपांडे.
( एका गांधी टोपीचा प्रवास from खिल्ली.)

No comments:

Post a Comment