सुभाषबाबूंच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेत नाही.तशी शंका घ्यायची योग्यता मिपावरील कोणाही सभासदाची असेल असे वाटत नाही, निदान माझी तरी नाही.पण तरीही त्यांच्या उद्देशाविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की जपानची मदत घेऊन भारत स्वतंत्र करायच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन मला तरी करता येत नाही.
जपानी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला मदत करत होते.पण जपान्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचे इरादे इतके नेक असतीलच असे १००% खात्रीने म्हणता येत नाही.जपान्यांना खरा रस होता पॅसिफिकमध्ये साम्राज्यविस्तार करण्यात.त्यासाठी त्यांनी सुरवात केली हवाई बेटातील पर्ल हार्बरवर हल्ला करून आणि दक्षिण पूर्व आशियात सिंगापूर-इंडोनिशिया या भागातही साम्राज्यविस्तार केला.चीनमधील नानकिंग हे बंदर ताब्यात असणे जपान्यांना महत्वाचे ठरले असते म्हणून त्या शहरावर जपान्यांनी हल्ला केला आणि तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले.त्याला रेप ऑफ नानकिंग म्हणतात.
जपान्यांनी ब्रम्हदेशातही १९४२ मध्ये बऱ्यापैकी inroads केले होते.आझाद हिंद सेना स्थापन झाली १९४२ मध्ये-- साधारण त्याच सुमारास आणि सेनेला बऱ्यापैकी आकार आला नंतरच्या काळात. १९४२ मधील सुरवातीचे ब्रम्हदेशावरील आक्रमण जपानी सैन्यानेच आझाद हिंद सेनेच्या मदतीशिवाय केले होते. तिथे जपान्यांना अनुकूल असे फारसे काही नाही.हवा पण रोगट.नैसर्गिक साधनसामुग्री पण फारशी नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की तरीही ब्रम्हदेशात जपानी का घुसले असावेत? त्याची माझ्या मते कारणे दोन: एक तर ब्रिटिशांविरूध्द strategic depth मिळवायला किंवा पूर्वोत्तर भारतातून बंगालमध्ये घुसायला. Strategic depth कशी?तर जितके इंग्रज जपान्यांच्या area of interest पासून दूर तितके जपान्यांना चांगले.दुसरे म्हणजे बंगालमध्ये कलकत्ता-चितगाव सारखी बंदरे आणि बंगालमध्ये होणारा तांदूळ-ताग अडी-अडचणीच्या वेळी उपयोगी येईल असे जपान्यांना वाटले असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये.
तेव्हा अधिक strategic depth मिळवायला किंवा भारतातील नैसर्गिक सामुग्रीचा उपयोग करून घ्यायला जपानी भारतात आले असते तर कलकत्ता-चितगावची अवस्था नानकिंगपेक्षा वेगळी झाली असती असे मला वाटत नाही.आणि त्याच प्रक्रियेत त्यांनी आझाद हिंद सेनेला मदत केली याचा हेतू नक्की काय होता?इंग्रजांशी परस्पर आझाद हिंद सेना लढली तर आपल्या डोक्यामागची कटकट कमी हा व्यावहारिक हेतू की भारताला मदत करायची genuine इच्छा?अर्थात हा जरतरचा मामला आहे आणि त्याविषयी नक्की सांगता येणार नाही.पण जपान्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेता जपान्यांपेक्षा इंग्रज खूपच परवडले असे म्हणायला हवे.सुभाषबाबूंचा हेतू प्रामाणिक होता यात शंका नाही पण भारतात आतपर्यंत घुसलेले जपानी आयत्या वेळा उलटले असते तर?मग एकाबाजूने इंग्रज आणि दुसरीकडे जपानी अशा कात्रीत पकडले जायची शक्यता नव्हतीच का? मला वाटते ती भिती प्रत्यक्षात उतरायची किती शक्यता होती हे माहित नाही पण ती १% तरी असेल तरी was it worth to pay that price?
या कारणामुळे जपान्यांची मदत घेऊन स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करायला माझ्या पातळीवर तरी समर्थन नाही. मी अगदी पूर्णपणे चुकीचा असेन पण जपान्यांनी भारतात नानकिंगसारख्या कत्तली करणे या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो.
----------
जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे जिंकली.नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य असे केले.पण जपान्यांनी अंदमानातही काही प्रमाणावर कत्तली केल्याच होत्या. (संदर्भ: पान १०२-१०३ ) त्यात म्हटले आहे की इंग्रजांनी अंदमान-निकोबारचा ताबा मिळविण्यापूर्वी ७५० सामान्य लोकांची हत्या केली. १९४५ मधील अंदमानची लोकसंख्या लक्षात घेता ७५० हा आकडा तसा मोठाच नव्हता का?या संदर्भात मागे मी Japanese in Andaman & Nicobar Islands red sun over black water या पुस्तकाची गुगल बुक्समध्ये उपलब्ध असलेली काही पाने वाचली होती.त्या पुस्तकाची सगळी पाने उपलब्ध नाहीत कारण कॉपीराईटमुळे अनेक पाने दिसत नाहीत.तरीही उपलब्ध पानांमधील संदर्भातून कळते की अंदमानमधील हॅवेलॉक बेटावर जपान्यांनी अत्याचार केले होते.आणि या पुस्तकाचे लेखक कोण?तर खडकवासल्याच्या एन.डी.ए मधील प्राध्यापक! तेव्हा हिटलर-जपान्यांच्या वाईट गोष्टी हजार पटीने वाढवून सांगायच्या आणि आपल्या वाईट गोष्टींविषयी काही बोलायचे नाही हा इंग्रज-अमेरिकनांवर होणारा आरोपही त्यांच्यावर करता येणार नाही.
एकूणच काय?की जपान्यांचा उद्देश होता आपल्याला पाहिजे त्या भागात हातपाय पसरायचे आणि कोणी विरोध करेल तर सरसहा कत्तली करायच्या मग ते नानकिंग असो, मांचुरिया असो की अंदमान.समजा जपानी (माझ्या मते) त्यांच्या इंटरेस्टच्या क्षेत्रात--पूर्वोत्तर भारत आणि बंगाल (बांगलादेशासकट) घुसले असते तर आणखी काही वेगळे झाले असते असे म्हणायला काय जागा आहे?
अंदमानातील लोकांच्या हाल-अपेष्टा नेताजींपर्यंत पोहोचल्या होत्या की नाही याची कल्पना नाही.तशा त्या पोहोचल्या असत्या तर ते नक्कीच गप्प बसले नसते.आणि त्या बातम्या नेताजींना समजल्या असतील तर जपान्यांना विरोध करण्याइतकी आझाद हिंद सेना सक्षम नव्हती या कारणाने नेताजी हतबल होते का?अशा जपान्यांच्या हातात कोलीत देणे योग्य होते का?कदाचित त्या काळी अंदमानात काय झाले हे त्यांना कळले नसेलही पण १९३६-३७ पासून जपान्यांनी व्यापलेल्या मांचुरियातही आणि नंतरच्या काळात व्यापलेल्या पॅसिफिकमधील प्रदेशातही काय झाले हे पण १९४२-४३ मध्ये माहित नव्हते? आणि समजा त्या काळी ते कळले नसेल तरीही आज या सगळ्या घटना कळल्यानंतरही केवळ सशस्त्र क्रांतीला समर्थन (किंवा गांधींच्या मार्गाला विरोध) म्हणून आंधळेपणाने जपानची मदत घ्यायचे समर्थन आपण का करतो?
त्यामुळेच नेताजींविषयी पूर्ण आदर बाळगत मी म्हणतो की मला त्यांचा जपान्यांची मदत घ्यायचा मार्ग मान्य नाही.
------------
जपानने मांचुरियावर १९३० च्या दशकातच पूर्वी (मला वाटते १९३२-३३ मध्ये) हल्ला केला होता त्यातूनच जपानची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा पूर्णपणे लपून राहिलेली नव्हती.तसेच मुसोलिनीचे ऍबिसिनीया (इथियोपिया) वरील आक्रमण १९३५-३६ चे.स्पॅनिश यादवी युद्ध १९३५-१९३६ च्या दरम्यानचे.जनरल फ्रॅन्कोने स्पेनची सत्ता ताब्यात घेतली याचा १९३६ च्या फैजपूर कॉंग्रेसमध्ये निषेधही झाला होता.आणि फ्रॅन्कोला हिटलरने मदतही केली होती हे पण लपून राहिलेले नव्हते.तेव्हा फॅसिस्ट शक्तींविरोधात कॉंग्रेसची भूमिका पहिल्यापासून होती असे म्हणायला नक्कीच वाव आहे. हिटलरने ऑस्ट्रीया घशात घातला मार्च १९३८ मध्ये.तेव्हा या सगळया पार्श्वभूमीवर नानकिंगमधील अत्याचार होते.ती isolated घटना नव्हती की त्याचा फारसा कुठे उल्लेख होणार नाही.
पंडित नेहरू हॅरो आणि केंब्रिजमध्ये शिकलेले होते.ब्रुसेल्समधील साम्राज्यवाद विरोधी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता.तसेच रशियन राज्यक्रांतीपासून अनेकविध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास नक्कीच होता.मार्च १९३८ मध्ये पंडित नेहरूंचा लंडनमधील ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये भाषण करतानाचा फोटो मी नेहरूंचे चरित्र वाचले त्यात आहे.म्हणजे मार्च १९३८ मध्ये नेहरू लंडनमध्ये हजर असतील तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नानकिंगच्या अत्याचाराचा अजिबात थांगपत्ता त्यांना नसेल हे जरा कठिणच वाटते. तसेच नेताजी स्वत: इंग्लंडमधून आय.सी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.तेव्हा त्यांनाही आंतरराष्ट्रीय perspective नक्कीच होता आणि त्यांना या घटनांचे गांभीर्य कळले नसेल असे म्हणता येणार नाही.इतक्या घटना एकामागोमाग एक घडत असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असेल यावर विश्वास कसा ठेवायचा?त्यांना हिटलरचे Concentration camps माहित नसतील पण जपान्यांनी अत्याचार केले आहेत याचीही त्यांना कल्पना आली नसेल?
बरं जे काही झाले ते झाले.नेताजींनी जे काही केले ते उदात्त भावनेने केले.पण कदाचित नेताजींना माहित नसलेल्या गोष्टी आज माहित झाल्या आहेत.तरीही आपण या मुद्द्यावर का अडून राहतो?
पंडित नेहरू म्हणाले होते की आझाद हिंद सेना भारतात आली तर त्याचा मी तलवारीने विरोध करेन.त्यांच्या या वाक्याची थट्टा उडविणे सोपे आहे.अगदी अविनाश धर्माधिकारींनीही त्याबद्दल नेहरूंवर टिका केली आहे.पण त्या सेनेच्या संगतीने जपानी भारतात घुसतील अशी भिती नेहरूंना वाटली असेल का?नक्की सांगता येणार नाही.पण तशी भिती वाटणे अगदीच निराधार नाही.
जपान्यांनी जे नानकिंगमध्ये केले, अंदमानात केले, इतर अनेक ठिकाणी केले तेच आझाद हिंद सेनेबरोबर भारतात घुसून केले नसतेच असे म्हणायला आधार कोणता?तेव्हा त्या प्रयत्नाला अपयश आले ही एका अर्थी चांगली गोष्ट झाली का?आणि परत वरचाच प्रश्न: १९४२-४३ मध्ये नेताजींनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन भारताचे हित लक्षात घेऊनच सगळा त्याग केला.पण नवीन माहिती आपल्याला कळली आहे त्यावरून जपान्यांशी संगत म्हणजे असंगाशी संग नव्हती का?
परकियांची भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत घेण्यात काहीही गैर नाही.पण त्या परकियाचा आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नको हा महत्वाचा मुद्दा का डावलला जात आहे?नाहीतर भारतीयांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जपानी (किंवा जपान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय) इंग्रजांवर हल्ला करणार.ते यशस्वी झाले तर जपान्यांनाही भारतात इंटरेस्ट असल्यामुळे (याची कारणे आधी मांडलेली आहेत. तसेच ब्रम्हदेशापर्यंत थडकलेले जपानी अचानक भारतीय सीमेवर स्तब्ध उभे राहतील असे मानायचेही काही कारण नाही.त्यातही नेताजींनी मनुष्यबळ भारतीयांकडून उभे केले असले तरी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे त्यांना कुठून येत होती?म्हणजे जपानवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे आले आणि त्यातच जपानचा भारतीय प्रदेशातील इंटरेस्ट हे लक्षात घेता त्याचे परिणाम गोड झालेच असते असे मानायला तुम्हाला वाटते तितका आधार आहे असे वाटत नाही.
त्यातही मला वाटते की परकियांची मदतच घ्यायची तर वेळ पडल्यास रशियाची मदत घेतली असती तर ते जपानची मदत घेण्य़ापेक्षा अधिक श्रेयस्कर ठरले असते. अर्थात त्या वेळी रशिया आपल्याला मदत करायच्या परिस्थितीत नव्हताच पण समजा असता तरी रशियाला भारतात इंटरेस्ट होता याचा पुरावा काय? तसेही रशिया अगदी शेवटपर्यंत इंग्लंडचा शत्रू राहिला असता तरीही चीन हा महाकाय देश ओलांडून भारतात ते यायची शक्यताही नव्हती. तेव्हा:
सर्वात महत्वाचे की ज्या परकियाकडून आपण मदत घेणार आहोत त्याचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नकोत. कत्तली हा मुद्दा महत्वाचा आहेच पण तरीही एखाद्या परकियाचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसतील (उदा. रशिया) तर त्यांनी इतरत्र केलेल्या कत्तलींची डायरेक्ट झळ भारताला लागायची शक्यता कमी होती. जपानबद्दल हे म्हणता येते का?
जपानी Comfort women याविषयी माहिती गोळा करा म्हणजे अनेक काळ्याकुट्ट गोष्टी कळून चुकतील.जर जपानी सैन्याने चीनमध्ये अनेक स्त्रियांना Comfort women म्हणून नेले तर त्यांनी ते भारतात केले नसते हे म्हणायला काय आधार आहे?दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रज सद्गुणाचे पुतळे नक्कीच नव्हते पण थोड्या काळात त्यांनी घेतलेल्या बळींची संख्या आणि क्रौर्य या बाबतीत ते इंग्रजांपेक्षा कितीतरी पुढे होते.तेव्हा माझा म्हणायचा मुद्दा एकच की इंग्रज वाईट हे मान्य पण त्यांना घालवायला त्यांच्यापेक्षा दहापट वाईट आणि कदाचित अधिक बलिष्ठ शत्रूला घरात घेतले तर त्याचे परिणाम चांगलेच होतील हे म्हणायला काय आधार आहे?
जपानचा नक्की हेतू काय होता?इंग्रजांविरूध्द strategic depth मिळवायला की भारताला स्वतंत्र करायला genuine मदत करणे? मला वाटते की इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून शक्य तितके दूर ठेवावे या कारणासाठी जपानचा भारतात इंटरेस्ट होता.आणि भारतीयांचा इंटरेस्ट इंग्रजांना हरविण्यात होता त्यामुळे एक सोयीचे लग्न (marriage of convenience) म्हणून ते एकत्र आले.तसेच जपान इंडोचायना, मलाया, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी लढाईत गुंतलेला असल्यामुळे भारताच्या आघाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि इंग्रजांना पूर्ण भारतातून कायमचे हाकलवणे हे फारच कठिण आहे हे त्यांना कळले नसेल असे मला तरी वाटत नाही.तेव्हा विजय मिळाला असता तरी जपानी सैन्य इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी भारताच्या भूभागात तळ ठोकून राहिले असते यात अशक्य काय?तेव्हा जपान्यांना नक्की काय हवे होते?एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांचे आणि आपले मार्ग आणि ध्येय सारखे होते हे मान्य.पण पुढे काय?
तसेच अंदमानात जपान्यांनी काय केले हे एका प्रतिसादात लिहिले आहे.तेच त्यांनी भारताच्या इतर भागात केले नसते याला आधार काय या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.
जपान्यांनी इतरत्र जो धुमाकूळ घातला त्यावरून भारतातही त्यांनी काही वेगळे केले असते असे मानायला जागा नाही.भारतावर त्यांची राजवट आली नाही हे आपले भाग्यच म्हणायचे.भारतावर ज्या ज्या परकियांचे आक्रमण झाले त्यात अलेक्झांडर सर्वात सुसंस्कृत म्हटला पाहिजे.इंग्रज सुसंस्कृत नसले तरी मोंगल,हूण यांच्यापेक्षा बरेच सोबर होते.लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली त्यावेळीही त्यांच्यावर कोर्टात रितसर खटला दाखल करून त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी देऊन इंग्रज कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली.तसेच सर्व क्रांतिकारकांना फाशी दिले नाही.अनेकांना जन्मठेपेची शिक्षाही केली.तेव्हा विरोध करतोस ना?मग घालतो गोळी अशी तालिबानी किंवा जपानी राजवट त्यांची नव्हती.म्हणूनच इंग्रजांना घालवायला त्यांच्याहून क्रूर जपान्यांची मदत घ्यायला माझा विरोध आहे.
बाकी इंग्रज राज्याचा मी समर्थक नक्कीच नाही.इंग्रज राज्याचे काय किंवा इतर कसलेही जे काही चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम आहेत ते बघावेत आणि त्यावरून मत बनवावे असे मला वाटते.इंग्रज राज्याचे वाईट परिणाम भारतावर झाले हे कोणी नाकारू शकतच नाही.पण एकूण जपान्यांची वर्तणूक बघता इंग्रज म्हणजे lesser evil होते हे माझे मत कायम आहे.आणि असे मत मांडले तर इंग्रज राज्याचा भाट असल्याचा आरोप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष.
जपानी अत्याचार करण्यात नाझींसारखेच क्रूर होते.त्यांच्या तावडीत भारताचा काही प्रदेश काही काळ राहणे म्हणजे दररोज जालियनवाला बागला लाजवतील अशी हत्याकांडे व्हायला आमंत्रणच नाही का?
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे ठिक आहे.पण ते कधी?शत्रूलाही आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसेल तर.जपान्यांना आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नव्हता का?तसे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.आणि अशा शत्रूच्या शत्रूला जवळ करून छावणीत उंट घेण्याप्रमाणे नाही का?
इंग्रजांचे सैन्य फोडून नेताजींनी इंग्रज सत्तेला मुळातून हादरा दिला हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी संग करण्याबद्दल आहे.
- गिरिश खरे

No comments:
Post a Comment