Wednesday, April 25, 2012

जीना आणि फाळणी

काही मंडळींना ’जिना उदारमतवादी, पुरोगामी होते पण गांधींच्या राजकारणामुळे ते जमातवादी झाले’ असा गैरसमज कुरवाळण्यात मोठी धन्यता वाटत असते. जिना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जमातवादीच होते. लखनौ कराराची कलमे पाहिली तर जीनांच्या    राष्ट्रवादाच्या कलमांची कल्पना येते. दोन जमाती समान सार्वभौम आहेत म्हणुन त्यांच्या समान सामुदायिक भागीदारीची राज्यव्यवस्था हवी असे थोडक्यात जीनांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेविषयी म्हणता येईल. कोणतेही कलम तीन चतुर्थांश मुस्लिम सभासदांच्या संमतीविना कायदेमंडळात मंजुर होणार नाही, हे कलम अल्पसंख्याक जमातीची बहुसंख्यांकांबरोबर राज्यकारभारात, सर्वच क्षेत्रांत समान भागीदारी प्रस्थापित करणारे होते. मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतांत मुसलमानांना संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व दिल्यावर हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या प्रांतात तेथील हिंदूंनाही तसे दिले जाणे आवश्यक होते. पण तसे देण्याची तरतूद लखनौ करारात नव्हती. जीनांच्या तथाकथित उदारमतवादाची आणि भारतीय राष्ट्रवादाशी जुळवून घेण्याच्या तयारीची मजल येथपर्यंतच गेली होती.

हा करार झाल्यानंतर त्याच वर्षीच्या मुस्लिम मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरुन जीनांनी काढलेले उद्गार अर्थपूर्ण आहेत. मुसलमानांना त्यांचा वेगळा खलिफा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण आणि मुस्लिम लीगचे इतर पुढारी भारतीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहोत असाही त्यांनी या भाषणात दावा केला आहे. येथे जीनांच्या कल्पना स्पष्ट होतात. आपण मुसलमानांचे एकमेव नेते व्हावे अशी त्यांची आकांक्षा होती. आपल्याला मुसलमानात गोखल्यांसारखे स्थान प्राप्त व्हावे असे त्यांना वाटत असे. गोखले आणि टिळक यांच्या राजकीय वर्तनावर जीनांनी कधी टिका केलेली नाही.

गांधी नेहरुंवर टिका करतानादेखील गोखल्यांचा मोठेपणा ते दाखवीत नाहीत असे जीना म्हणत. जीनांनी हा फरक करण्याची कारणे स्पष्ट आहेत.

गोखले उदारतेने मुसलमानांना केंद्रात चाळीस टक्के प्रतिनिधीत्व द्यायला तयार झाले होते. टिळक वेगळा मतदारसंघ देत होते, मुस्लिम अल्पसंख्यांक प्रांतात संख्येहून अधिक प्रतिनिधीत्व देत होते आणि मुख्य म्हणजे मुस्लिम लीगशी करार करुन ही संघटना मुसलमानांची प्रतिनिधी आहे आणि पर्यायाने कॉग्रेस ही हिंदूंची प्रतिनिधी आहे असे मान्य करत होते. "तुम्ही माझ्याशी टिळकांप्रमाणे बोलणी का करत नाही? ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणुन माझ्याशी बोलत होते." असे जीनांनी एकदा गांधी-नेहरुंना म्हटलेच होते. गांधीजी आणि नेहरु सर्वच जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत असे म्हणवून घेत होते अशी जिनांची खरी तक्रार होती. कॉंग्रेस हिंदू संघटना आहे, गांधी-नेहरु हिंदू आहेत, हे सगळे जीनांनी म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्याचा अर्थ कॉंग्रेस हिंदू संघटना राहावी आणि गांधी-नेहरुंनी हिंदूंचेच प्रतिनिधीत्व करावे असे जीनांना सुचवायचे होते. ते हिंदूंपुरता विचार करत नाहीत हा जीनांचा त्यांच्यावर राग होता. जीनांची या संदर्भातली जातीयवादाची(communalism) व्याख्या अजब होती. गांधी-नेहरु जातीयवादी विचार करत नाहीत म्हणुन ते जातीयवादी आहेत असे ते म्हणायचे.

हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये कधी जिनांनी मुस्लिमांना दोष दिल्याचे दाखवून द्यावे.

१९३१ साली आपल्याला राजकारणात पाहिजे तसे स्थान आणि महत्व्व मिळत नाही, हे पाहून जिनांनी कायमस्वरुपी इंग्लंडला जायचे ठरविले, तेव्हा त्यांना "मुस्लिम स्टुडंट्स युनियन" ने निरोपादाखल मेजवानी दिली. या प्रसंगी या राष्ट्रवादी मानल्या गेलेल्या नेत्याने जातीय भाषण केले. "भारताचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या स्वधर्मियांच्या भावना निर्लज्जपणे भडकावाण्याशिवाय जिनांनी आपला राजकीय वारसा म्हणुन अधिक काही चांगले मागे ठेवले नाही, ही मोठ्या दु:खाची गोष्ट आहे" असा न्या. छागलांचा अभिप्राय आहे. छागलांनी जिनांना हिंदू मुसलमानांचा एक संयुक्त पक्ष स्थापन करण्याची सूचना केली त्यावर जिना त्यांना म्हणाले, "तुम्ही ध्येयवादी आहात, उलट जी काही साधने उपलब्ध असतील, ती घेवुन मला काम करायचे आहे."  

Monday, April 16, 2012

फाळणी

फाळणी रोखायची असेल तर मुस्लिम बहुसंख्येच्या प्रांतांमध्ये निवडणुका जिंकाव्या लागतात ... आणि विभक्त मतदारसंघ ते करु देत नाही... तेव्हा विभक्त मतदारसंघ रद्द करुन घ्यावे लागतात. आणि तसं शक्य होत नसेल तर मुस्लिम लीगच्या ५० टक्केच्या भागीदारीच्या मागणीला मान्यता द्यावी लागते. ही किंमत चुकवायची तयारी नसते म्हणुन फाळणी होते. नुसतं पुण्या-मुंबईत अखंड भारताच्या नावाने भावनिक, टाळ्या पिटवणारी व्याख्यानं आणि बौद्धिकं घेवुन फाळणी टळत नाही!

----------

निवडणुकांनी हे सिद्ध केलं की, मुस्लिम बहुसंख्येच्या प्रांतांमध्ये
लीगच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहे आणि कॉंग्रेसच्या बाजूने
मुसलमान नाहीत... मुस्लिम लीगच्या मागण्यांना weightage आलं आणि या मागण्या
वाढत गेल्या. स्वतंत्र पाकिस्तानवादी झालेल्या या जनतेला कश्याच्या जोरावर
अखंड भारतात राहावेच लागेल असे सांगायचे ? हिंदू - मुस्लिम ही दोन वेगळी
राष्ट्रे आहेत हे मान्य करता तर हिंदूंना जशी स्वतंत्र भूमी हवीय, तशीच
मुस्लिमांना कशाच्या बेसिसवर नाकारायची?

कुणी कितीही नाकारले तरी
विभक्त मतदारसंघांमुळे फाळणी होणे शक्य झाले ही वस्तुस्थिती आहे. ह्यांत
टिळकांच्या माथी खापर फोडण्याचा संबंधच नाही, Its a fact!
पण काय आहे,
खिलाफतीला पाठिंबा देणारे गांधी बावळट, आणि विभक्त मतदारसंघ देणारे टिळक
मात्र धूर्त, मुत्सद्दी अशी काही मंडळींची विनाकारण भोळी समजुत असते... या
मंडळींनी हे ध्यानात घ्यावे की, खिलाफत चळवळीला टिळकांचा सुद्धा पाठिंबा होता.
नुसता टिळकांचाच नाही, तर तेव्हाच्या सर्व बड्या नेत्यांचा ( चित्तरंजन
दास, मोतीलाल नेहरु, लाला लजपतराय, तेजबहाद्दूर सप्रू इ.) पाठिंबा होता. या
सर्व मंडळींना मुस्लिम प्रश्नच कळला नाही, तो कळला फक्त आमच्या
नेत्यांना... अशी मनाची समजुत करुन घेतली म्हणजे मग इतरांना शिव्या घालणे
सोपे जाते.

खिलाफत चळवळीपूर्वी हिंदू-मुसलमान गुण्या-गोविंदाने राहत होते का ? खिलाफतीने मुसलमानांची आंतरराष्ट्रीय जाणीव वाढली ? मग आंबेडकर-मोरे या मंडळींनी १८५७ च्या उठावाला जिहाद का म्हटलंय ? तेव्हा आंतरराष्ट्रीय जाणीव नव्हती का ? मुस्लिम सत्ताधीश स्वत:ला तुर्क, पठाण, मंगोल असंच मानत नव्हते का ?

बाकी सिंध-बंगाल प्रांतात हिंदू महासभा कार्यरत होती हे
ठाउक आहेच.. त्याशिवाय का पाकिस्तानची मागणी सुरु असताना महासभा लीगसोबत
सरकारे चालवत होती ! 

Wednesday, April 4, 2012

गांधींचे राजकारण जिनावाद्यांच्या नजरेतुन



टिळकांचाच काय, पण सावरकरांपेक्षाही मुसलमानांना गांधींचाच धोका आणि पर्यायाने धाकसुद्धा अधिक असल्याचे ब-याच जीनावादी मुस्लिमांना वाटत होते, असे सांगितले, तर कित्येकांना आश्चर्य वाटेल..पण हे खरे आहे. सावरकर आणि त्यांचे समविचारी गांधींकडे मुस्लिमांचा अनुयय करणारा हिंदूहितविरोधक म्हणुन पाहत असले, तरी पाकिस्तानवादी मुस्लिम त्यांच्याकडे अगदी यांच्या उलट प्रकारे पाहत होते. झेड. ए. सुलेरी नामक जिनांच्या निकटवर्ती अनुयायाचे याबद्दलचे विवेचन प्रातिनिधीक मानायला हरकत नाही. सुलेरी "डॉन" ह्या वृत्तपत्राचे संपादक होते. सुलेरींचे "माय लीडर" हे पुस्तक या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.

सुलेरी आपल्या पुस्तकात जिनांचे गांधीविषयीचे मत उद्धुत करतात - "गांधींना समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि वास्तवाच्या अंतरंगांत खोलवर उतरावे लागेल."

सुलेरींनी अगदी सुरुवातीलाच गांधींबद्दलचे आपले मत स्पष्टपणे प्रकट केले आहे - [b]"एक व्यक्ती-एक मत असा अर्थ असलेल्या लोकशाहीच्या आवरणाखाली गांधी मुसलमानांच्या अस्तित्वावर सखोल प्रहार करण्याच्या निकटतम बिंदूपर्यंत येऊन ठाकले होते."[/b]

’गांधींनी भारतातील मुसलमानांची स्वतंत्र ओळख पुसून टाकून त्यांना गिळंकृत करुन टाकायची वेळ आणली होती; परंतु जिनांनी त्यांना वाचवले.’ असा सुलेरींच्या प्रतिपादनाचा रोख आहे. ’गांधी मुसलमानांचे निर्मुसलमानीकरण (deislamization) करु पाहात होते. ही योजना  जवळजवळ सिद्धीसही गेली होती,’ हे सुलेरी उदाहरणानेच सिद्ध करतात.

"ज्याच्या आयुष्यात माणसांच्या वर्गीकरणाच्या मुसलमान किंवा काफीर या दोनच कसोट्या होत्या, अशा बलाढ्य़ पठाणाला खादी आणि गांधी टोपी परिधान करताना आणि अहिंसेच्या संप्रदायाचे जलद गतीने ग्रहण करायला शिकताना पाहायचे. मुसलमानांच्या व्यक्तित्वात आणि स्वभावात असा धक्कादायक बदल पूर्वी कल्पनातीत होता. परंतु तसे प्रत्यक्षात घडले आणि त्याचे श्रेय पूर्णत: गांधींना द्यावे लागते."

जिनांनी गांधींच्या या महासंकटातून इस्लामला वाचवले म्हणून ’गांधी म्हणजे जिनांच्या यशाचे खरे मोजमाप होय’ असे सुलेरी म्हणतात; परंतु प्रारंभीच्या काळात मुसलमान ’गांधी गारुडा’ला इतके भाळले होते की, त्यांनी जिनांच्या इराद्याला जुमानले नाही, तेव्हा निराश होवून जिनांना काही काळ निवृत्त व्हायला लागले, असेही ते निदर्शनास आणून देतात.

सुलेरी ब्रिटीश काळातील मुस्लिमांच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतात. १८५७ च्या बंडात ब्रिटीशांना दुखावल्यामुळे ब्रिटीशांनी मुसलमानांना लक्ष्य केले असा त्यांचा युक्तिवाद आहे. मुस्लिमांचा हा -हास सर सय्यद अहमद खानांनी थोपवला. त्यांच्यामुळे मुस्लिम कॉंग्रेसच्या जाळ्यात सापडू शकले नाहीत. उलट आपल्या स्वतंत्र आणि समांतर अश्या राजकीय अस्तित्वाची जाणीव घेवुन त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली व आपल्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळविण्यात यश मिळविले. त्यांचे हे अस्तित्व कॉंग्रेसला मान्य करावे लागले. याचा पावतीवजा पुरावा म्हणजे सन १९१६ चा टिळक-जीना म्हणजेच कॉंग्रेस-मुस्लिम लीग लखनौ करार !

[b]परंतु मुस्लिमांनी प्रयासाने मिळवलेली ही राजकीय स्वायत्तता गांधींनी धुळीला मिळवली. ही किमया गांधी खिलाफतीच्या माध्यमातून करु शकले! मुस्लिमांच्या खिलाफतीला पाठींबा देवून गांधींनी त्यांना कॉग्रेसकडे नुसते वळवून घेतले, असे नाही, तर त्यांची प्रातिनिधीक राजकीय संस्था मुस्लिम लीग नामशेष करुन टाकली. यात गांधींचा हेतू मुसलमानांचे हिंदूकरण करण्याचा होता. गांधींनी सय्यद अहमदांच्या कामावर बोळा फिरवला.[/b]

गांधींनी ऐक्याचा आणि लोकशाहीचा सापळा लावून त्यात खिलाफतीचे आमिष ठेवले व मुस्लिम त्याला बळी पडू लागले, असा सुलेरींचा अन्वयार्थ आहे. लोकशाहीचा स्वीकार याचा मुस्लिमांसाठी परिणाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदू राज्याचा स्वीकार होय.

गांधींनी खिलाफतीचे निमित्त करुन मुस्लिमांना ब्रिटीशांविरुद्ध लढायची चिथावणी दिली. यात गांधी परस्पर ब्रिटीशांच्या हातून मुस्लिमांचा काटा काढू पाहत होते.

या संदर्भात सुलेरींनी केलेले इतिहासाचे वाचन बाबाराव सावरकरांच्या वाचनाच्या अगदी विरुद्ध होते. "अफगाण आमिराला भारतात पाचारण करुन गांधी ब्रिटीशांऐवजी मुस्लिमांची सत्ता स्थापायला निघालेले जयचंद असल्याचा" बाबारावांचा आणि इतर हिंदूत्वनिष्ठांचा आरोप होता. ही मंडळी गांधींचे जे उद्गार उद्ध्रुत करुन त्यांच्यावर हिंदूद्रोहाचा आरोप करतात, तेच उद्गार सुलेरी उद्ध्रुत करतात; पण त्यावरुन त्यांनी काढलेला निष्कर्ष अगदीच वेगळा आहे. हे उद्गार ४ मे १९२१ च्या ’यंग इंडिया’ मधील आहेत. गांधी लिहितात, "अफगाणिस्तानच्या अमिराने ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध युद्ध पुकारले, तर मी एका अर्थाने त्याला निश्चितच मदत करेन."

"सीमारेषेवरिल कोणत्याही आक्रमणाला थारा मिळणार नाही, इतके ब्रिटीश सैन्य सुसज्ज आहे" हे गांधींनी नुकतेच केलेले विधान उद्ध्रुत करुन सुलेरी सांगतात की, गांधींनी अमिराला दिलेले निमंत्रण हेच खरे नसून मुस्लिमांना दिलेली चिथावणी हीच खरी. अमिरामध्ये भारतावर आक्रमण करण्याचे सामर्थ्य नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते, त्यामुळे यात त्यांच्या मायभूमीला कोणताच धोका पोहोचणार नव्हता.

गांधींनी १८५७ च्या बंडाचा इतिहास चांगला समजून घेतला होता, याचा उल्लेख करुन सुलेरी सुचवतात की, काही कडव्या मुस्लिमांनी देशत्याग केला व काहींचा कारस्थानी राजद्रोही म्हणून ब्रिटीशांनी बंदोबस्त केला. आणि उरलेले लोकशाही राष्ट्राच्या सापळ्यात अलगद अडकले म्हणजे भारतात मुस्लिमांचे राजकीय अस्तित्व राहिलेच कुठे?

सावरकर बंधूंच्या मते मात्र गांधींना मुस्लिमांचे कावे कळत नव्हते, इतिहास समजत नव्हता.

Wednesday, March 14, 2012

शिवाजी - रामदास संबंध :- प्रा. त्र्यं.शं. शेजवलकर

आपल्या प्रस्तावित शिवचरित्राच्या प्रस्तावनेत थोर इतिहासकार प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी शिवाजी - रामदास संबंधी काही विवेचन केले आहे. ते पुढील प्रमाणे -

"
शिवाजीला आपले कार्य रामदासाच्या उपदेशानंतर सुचले असे नाही. याबाबत भोंगळ रामदासी लेखकांनी केलेला बोभाटा व्यर्थ आहे.दासबोधातले काही दशक शिवचरित्रांतील विशिष्ट प्रसंगांना उद्देश्युन लिहिले गेले, असे म्हाणण्याला स्पष्ट पुरावा ग्रंथांत कोठेही नाही. ओढूनताणून शब्दांचे अर्थ लावून याबाबत केलेला प्रयत्न खात्री पटविणारा नाही. रामदास व शिवाजी हे दोघेी पुरुष समर्थ व कर्तबगार होते. त्यांचा कालांतराने परस्परमित्रभावही जडला. पण त्याचा सुपरिणाम इतकाच की, शिवाजीच्या मनाला प्रपंचांतील क्लेशांपासून त्या़ची मुक्तता होऊन आंतरिक समाधान लाभले व संसाराच्या विचित्र रहाटीबद्दल त्याची समजुत पडून स्थितप्रज्ञाप्रमाणें शांत मनाने देहत्याग करण्याची तयारी त्याला करता आली.

या दोघांच्या संबंधांबाबत हनुमानस्वामींचे रामदासचरित्र भलत्याच काल्पनिक गोष्टी सांगते....पण त्यात विश्वसनीय भाग फारच थोडा दिसतो. त्याच्या आधारावर आधुनिक ब्राम्हणांनी शिवाजीच्या गुरुत्वाचे मोठेपण स्वत:च्या जातीला चिटकविणे ही तर भ्रमिष्टपणाची पराकोटी म्हटली पाहिजे. पण अश्या बालीश चाळ्यांत महाराष्ट्रातील शहाण्यासुरत्या लोकांनी तीन पिढ्य़ा कालापव्यय केला व लोकांना चुकीच्या मार्गावर हिंडविले, ही गोष्ट इतिहासात विसरता येण्यासारखी नाही. या हुल्लडीला इतिहासलेखक, तत्वज्ञानी, कादंबरीकार, निबंधकार, कवी सर्वच कमीजास्त प्रमाणात बळी पडले व समाजावर त्याचा मोठा अनिष्ट परिणाम घडला हे नमूद केले पाहिजे.
.....
 ....
रामदासांचे लिहिणें काही ठिकाणीं विचित्र, दुर्बोध, अर्थहीन आहे असे भासते. मागच्यापुढच्या ग्रंथाशी त्याचा संबंध दाखविता येत नाही. असे उतारे रामदासांनी शिवचरित्रातील विशिष्ट प्रसंगी लिहून शिवाजीकडे सूचना म्हणुन पाठविले, असे म्हणण्याला भक्तांना सवड होते व त्याचाच उपयोग करुन रामदास शिवाजींच्या काल्पनिक संबंधांची इमारत उभी करण्यात आली आहे. हनुमानस्वामींनी लगट करुन, ’सिऊबा’ सारखे घरगुती शब्द दोघांच्या संबंधांत योजून, त्यांची फार घसट होती, असा आभास उत्पन्न केला आहे. तोच कित्ता आधुनिक लेखकांनी गिरवून, शिवाजीचे सर्व चरित्र रामदासांनी आखल्याप्रमाणे चालले होते, अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदासांनी ठिकठिकाणी असंख्य मठ स्थापून शिवाजीच्या स्वारीचा रस्ता त्यांच्या अनुरोधाने ठरविला होता; तेच सर्व बातम्या काढीत व शिवाजीकडे कळवीत; निरोप इकडून तिकडे नेत, अशी रचना कादंबरीकारांनी व गोष्टीवेल्हाळांनी करुन इतिहासकाराचे काम स्वत:कडे खेचले आहे. त्यांना मदत म्हणुन अंध संशोधकांनी, रामदासांनी अखिल हिंदुस्थानची यात्रा बारा वर्षे केली; शेकडो मठ प्रांतोप्रांती स्थापिले; रामदासी उपदेशक सर्वत्र फैलाविले, अशा वार्ता अल्प आधारावर प्रदीर्घ प्रचलित केल्या आहेत. पण त्यांना अस्सल आधार. नि:शंक पुरावा थोडाच मिळाला आहे. बाकी सर्व इच्छापूर्तीचा व कल्पनेचा खेळ आहे. एवढा खटाटोप पन्नास वर्षे करुनही रामदासांच्या चरित्रांत स्पष्ट घडामोडींची भर पडू शकलेली नाही. तर्कावरच सर्व मदार ठेवण्यात आलेली आहे. ....
....
असेच सर्व आयुष्यभर चालून, रामदासांच्या शिष्यांमुळे शिवाजी आग्र्याहून सुरक्षित परत येतो; राज्याभिषेकाची युक्ती रामदासच त्याला सुचवितात; गागाभट्टासारखा महापंडित दासांपुढे लीन होतो, वगैरे वगैरे सांगणे क्रमप्राप्तच झाले. मात्र संभाजीच्या स्वेच्छाचाराविरुद्ध स्वामींना काही एक करता येत नाही. सज्जनगडाहून तो त्यांच्या दृष्टीसमोर मोगलांकडे पळून जातो., इत्यादी क्षुल्लक गोष्टी कोठे या चरित्रात येऊ द्यायच्या नाहीत एवढी काळजी घेतली म्हणजे झाले!
...
...
रामदासी पंथांत राजकारण अनस्युतच असते, तर ते इतिहासात कोठे ना कोठे दिसलेच असते. रामदास हे अनभवी, पुष्कळ पाहिलेले व ऐकिलेले शहाणे पुरुष होते.....पण स्वत:ची प्रत्येक गोष्ट समर्थांना सांगून मग शिवाजी आचरणात आणी, असे म्हणण्यास काहीही आधार नाही. फार कशाला, परमार्थाबाबतही शिवाजी याकूतबाबा किंवा मौनी महाराज यांना भेटला तो प्रथम रामदासांच्या कानावर ती गोष्ट घालून, असे कोणी मानील काय? ...

.. रामदासी पंथ खरोखरीच शिवाजीच्या कार्याला पोषक म्हणुन निघाला असता तर एका पिढीत त्याचे कार्य खलास झाले नसते. ते झाले याचा अर्थ तो हिंदुधर्म तारण्यासाठी  काढलेला राजकारणी पंथ नव्हता हेच ठरते....अतएव रामदासी पंथाने काही ऐतिहासिक राजकीय कार्य महाराष्ट्रात घडवून आणले, हा प्रवाद युरोपच्या इतिहासाच्या वडाची साल पिंपळाला चिकटविण्याचा अव्यापारेषु व्यापार करणा-या काही इंग्रजीशिक्षित कल्पकांच्या मेंदूची विकृती आहे. खोट्या जात्याभिमानाने आत्मतुष्टी निर्माण करण्याचा तो एक खोडसाळ प्रयत्न आहे, असे गेल्या पाऊणशे वर्षांतील एतद्विषयक लिखाणावरुन ठरते.

....पेशवाईत रामदासी पंथाचा फारसा प्रसार झाल्याचे आढळत नाही. कोणीही पेशव्यांचे लक्ष समर्थांनी वेधून घेतल्याचे नमूद नाही. पेशव्यांच्या ग्रंथशाळेत दासबोधाच्या प्रतीची नोंद नाही. पेशवाईच्या अखेरीस रामदासस्वामींची बखर हनुमानस्वामींनी सजविल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या कौतुकास पुन: उजाळा मिळाला. सभासदाला आपल्या बखरीत रामदासांचे नावही कोठे आणण्याची जरुरी भासली नाही. यावरुन समकालीनांत शिवचरित्रावर दासांच्या कर्तृत्वाची विशेष छाप पडली होती, असे दिसून येत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी चिटणीसांनी आपल्या बखरीत रामदास आणिले. त्यांच्या आख्यायिकेस इंग्रजी इतिहासातही स्थान मिळाले. पण शिवचरित्रात रामदासांचा बोलबाला एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नव्याने पुढे आलेल्या इतिहास संशोधकांनी केला. रानड्यांच्या अंभूत भक्तिभावामुळे महाराष्ट्र संतांच्या कार्याला ऐतिहासिक अधिष्ठान लाभले. त्यातूनच संतांच्या कार्याची छाननी सुरु होऊन प्रार्थना समाज प्रभृती सुधारक पंथीयांनी तुकारामाचा उदो उदो आरंभिला. यांत ब्राम्हणांवर प्रच्छन्न टिका असल्यामुळे ब्राम्हणाभिमानी सनातन पक्षाने रामदासांनी पुढे आणिले व त्यांच्याकडे शिवकालीन, नव्हे शिवाजीच्या उदयाची मुख्य कामगिरी सोपविली.

नवे नवे कागद पुढे आणणारे व त्यांचा गूढार्थ बारकाईने सांगणारे इतिहास संशोधकच रामदासांची पाठ पुरविणारे झाल्यामुळे सामान्य वाचकांचा - आणि हे वाचक ब्राम्हणादी पांढरपेशे होते - सहजच समज असा होऊन बसला की, शिवाजीच्या कार्याची आखणी मुख्यत:समर्थांनी केली. राजवाड्यांसारख्या प्रतिभावान तिखट लेखकाने या मताचा पुरस्कार व प्रचार हाती घेतल्याने त्यांच्या भोळ्या भाबड्या भक्तांनी तोच क्रम उगाळण्याचे काम सर्वत्र चालू ठेविले. त्यामुळे हा समज जनमनात दृढ होऊन बसला आहे. पण मुळातच त्याला अस्सल आधार अत्यल्प असल्याने त्या पायावर एवढा मोठा इमला उभा करणे शक्य नाही.

.. ब्राम्हणांनी इतिहासाचा हा जो नवा डोलारा उभारिला त्याला मुळातच बिलकुल आधार नव्हता हे त्यांनी झाकून ठेविले आणि महाराष्ट्रातील सर्व वाङ्मयीन जगत त्यांच्याच सत्तेखाली असल्याने तसे करणे शक्य झाले. पुढे केळुसकरांसारखे साक्षेपी मराठे स्वत: बखरी वाचून पाहू लागले तेव्हा त्यास आढळले की, एकाही ऐतिहासिक बखरीत शिवाजीने रामदासांच्या झोळीत राज्य टाकल्याची कथा नाही ! अर्थातच त्यांच्या मते छत्रपती व शिवाजी यांचा संबंध परमार्थसाधनेपुरता उरला. पण हे म्हणणे इतिहास संशोधकास अमान्य. म्हणून त्यांनी त्या ग्रंथावरच वाळी घातली. म्हणजे केळुसकरांचे पुस्तक ब्राम्हणांत वाचले गेलेच नाही असे झाले. आणि ही प्रथा आजवर महाराष्ट्र वाङ्मयात चालू आहे.
"
  
संदर्भ - निवडक शेजवलकर, श्रीशिवछत्रपतींचे चरित्र- दोन उतारे, पृ. क्र. १७ ते ४३, साहित्य अकादमी

Friday, March 9, 2012

एका गांधी टोपीचा प्रवास

" कधी एखादा हिंदुत्ववादीही यायचा. हे लोक हिंसावादी असल्याचा आव आणीत. तोंडाने भगतसिंग, सावरकर पृभूतीची तारीफ करीत. परंतु त्यांचे हाथ पिस्तुलाशी न जुळता, account generalचे office, post, railway, revenue dept असल्या सरकारी चाकरीत लेखणी घासण्यात गुंतलेले असायचे.

गांधीजींच्या चळवळीत फार मोठ्या प्रमाणात बहुजनसमाज आला होता. हजारोंच्या संख्येने बायका सत्याग्रहात शिरून तुरुंगात चालल्या होत्या. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या सर्व थरातले हे चैतन्य महत्वाचे वाटत नव्हते. या मंडळीत एक विलक्षण नतद्रष्टेपणा असायचा. राजकीय चळवळ म्हणजे एक व्यासपीठ, दोन खुर्च्या, मग अध्यक्षाचे फर्डे भाषण, आभार हीच या लोकांची कल्पना होती. वाचावीरच स्वराज्य मिळवून देयील. फार तर कुणीतरी ५-१५ bomb वगैरे फेकावे.( स्वतःचा मुलगा मात्र नसावा. त्याला कुठेतरी चिटकवून द्यायची तयारी चाललेली असायची.)

वेळोवेळी इतिहासाच्या पूर्वदिव्यात घुसायच-असली काहीतरी चमत्कारिक वृत्ती असलेली हि माणसे! त्यात काही मंडळी " काय म्हणतोय तुमचा गांधी?" अस विचारून " एकून सारा पोरखेळ चाललाय" असा शेरा मारून जायचे. बाबू गेनू नावाच्या एका मजुराने परदेशी कापडाची लॉरी पुढे जावू देणार नाही या निर्धाराने स्वतःला त्या खाली चिरडून घेतले होते. हि असली उदाहरणे डोळ्यापुढे घडत असतानाही, हि चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचलेली आहे याची जाणीव या गांधी द्वेषाने अंध झालेल्या मंडळीना येत नव्हती.

गांधीजीचा मुसलमानधार्जीनेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांच्या नीषेधापेक्षा, मुसलमान गुंडांनी केलेल्या अत्याचारांच्या वेळी त्यांच्या लेखणीला आणि वाणीला विशेष धार चढे. बरे, हिंदू-मुस्लीम दंगलीत कधी हि मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणाव तर तेही नव्हत.

हे येरू वगळले तर त्या काळी, आम्हा अनेकांच्या आयुष्याचे कर्णधार महात्मा गांधी होते.


---------- पु ल देशपांडे.
( एका गांधी टोपीचा प्रवास from खिल्ली.)

गांधी, कॉंग्रेस आणि गांधीवाद

गांधीवाद हा समाजवाद, भांडवलवाद ह्यांसारखा वाद नाहीये. तो हिंदु धर्माचं खरं इंटरप्रेटेशन आहे. त्याच्या अनुषंगांने समाजात लोकांनी कसं जगावं.. कसं वागावं..समाजव्यवस्था कशी असावी, अर्थव्यवस्था कशी असावी..राज्यव्यवस्था कशी असावी ह्याबद्दलची गांधींची मतं आहेत आणि ती त्यांनी त्यांच्या अनुभवातुन, निरिक्षणातुन बनवली होती...त्यांनी त्याचा प्रचार केला.... लोकांनी त्या मतांचा आदर केला [follow नाही केलीत].

गांधींमागे लोकं का गेली ह्याचे उत्तर गांधीवादात नाहीये...तो फ़ारसा लोकांना कळला नाहीच कधी. पण लोकांना त्या व्यक्तीबद्दल खात्री होती. तो जे म्हणतोय तसं केल्याने आपला उद्धार होईल हे त्यांना जाणवत होतं. म्हणुन त्यांना प्रत्येक राजकिय चळवळीत प्रचंड जनाधार मिळाला.

गांधींच्या जनाधाराचा, संघटन कौशल्याचा फ़ायदा कॉंग्रेसच्या नेत्यांनी पुरेपुर उचलला...एका जिल्ह्याचे नेते व्हायची लायकी नसलेले लोकं प्रमुख नेते म्हणुन पुढे आले. सत्ताधीश झालेत. लोकांपुढे फ़क्त गांधींची जपमाळ ओढुन आपणच खरे गांधीवादी म्हणुन त्या लोकांनी मिरवले. आणि लोकांनाही गांधीवादातला ’ग’ ही माहित नसल्याने ते कॉंग्रेसच्या मागे फ़रफ़टत गेले.

एकतर गांधीवाद माहित नाही...वरुन कम्युनिस्ट आणि फ़ॅसिस्ट संघटनांनी गेले ८० वर्ष गांधींबद्दल अपप्रचार सुरु ठेवलाय त्याचाही थोडा परिणाम झालाच आणि गांधी हळुहळु बदनाम होत गेले. पण एक ’लगे रहो मुन्नाभाई" आला आणि वातावरण पुन्हा बदलले. गांधीबद्दलचे प्रेम भारतीयांच्या मनात इतके खोलवर रुजलंय की त्यांची बदनामी सिरिअसली घेणेही भारतीय टाळतो. गांधी हा साधारण माणुस होता...कोणी अद्वितीय विचारवंत, विद्वान नव्हता हे भारतीयांना माहिती आहे. पण जसा आपल्या घरातला वृद्ध माणसाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण आदर बागळुन असतो, तसाच आदर भारतीय गांधींबद्दल बाळगुन आहेत.

-----------

धीजींची ताकद हीच की ते भारतीयांचे पाणी पुरेपूर जोखून होते. क्रांती, स्वातंत्र्य वगैरे नवविचार भारतीयांना कितपत आणि कुठवर झेपतील याचा अंदाज गांधीजींना सर्वात चांगला होता. त्यांचा पंचा हासुद्धा (तत्कालीन) भारतीयांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांचाच भाग समजला पाहिजे. नेता म्हणजे कुणीतरी भारदस्त, तेजस्वी, परग्रहावरून आल्यासारखा माणूस या समजाला गांधींनी छेद दिला.
त्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीचे उपायही साधे सोपे असत. "तुम्हाला दांडीयात्रेत यायचे असेल तर माझ्यासोबत चाला. इंग्रजांच्या लाठ्या खा. ते जमत नसल्यास घरी चरखा चालवून देशाला बळ द्या. तेसुद्धा जमत नसेल तर परमेश्वराकडे आमच्या आंदोलनाला यश यावे म्हणून प्रार्थना करा." देशातल्या लहानातल्या लहान माणसाला त्यांनी काही ना काही कार्यक्रम दिला होता. आपल्या अनुयायांना इतके समजून घेणारा नेता दुसरा नसेल.
गांधीजी साधे होते, ते या अर्थाने. 
- ज्ञानेश पाटील

--------

स्वातंत्र्य आपोआप कुठुन मिळेल? इतक्या चळवळी, इतके सत्याग्रह स्वातंत्र्य मागण्यासाठी नव्हते? १९४२ ला दिलेला चलेजावचा नारा देण्याइतके आत्मिक बल कुठुन आले?

स्वातंत्र्याला आपण लायक आहोत याची पुरेपुर खात्री पटल्याशिवाय १९३० साली कॉंग्रेसने दिलेला पुर्ण स्वातंत्र्याचा नारा गांधींना विश्वासात न घेताच आला? १९३१ साली गोलमेज परिषदेत स्वातंत्र्य मागायला गांधी उगाच गेले होते का?
१९२२ च्या चौरीचौरा प्रकरणामुळे चळवळ मागे घेणाऱ्या गांधींना पुढच्या सात-आठ वर्षात खात्री पटली की भारतीय स्वातंत्र्याला लायक आहेत असं ह्या मधल्या काळात कुठले लोकपरिवर्तन झाले होते?

’भारतीय लोकांना स्वातंत्र्याला लायक बनविणे’ असं गांधींना वाटणं म्हणजे आपण स्वत: कोणीतरी महान आहोत असा विचार त्यांच्या मनात असला पाहिजे. स्वत:ला महान समजण्याइतके गांधी लहान अजिबात नव्हते.

गांधी जे वैयक्तिक आयुष्य जगले त्याचे अनुकरण किती कॉंग्रेसी नेत्यांनीही केलं असेल याची एकदा यादी करुन बघावी. लोकांनी तर सोडाच बहुतांश कॉंग्रेसीनीही गांधीवाद कधीही आचरला नाही.

कितीही कटु असले तरी सत्य हेच आहे की गांधींच महत्व हे लोकांना राजकिय चळ्वळीत ओढुन आणण्याइतकंच होतं. गांधीवाद भारतीयांच्या पचनी कधी पडलाच नाही, पण त्याबद्दल आदर मात्र नक्कीच होता, कारण गांधीचे विचार हे पारंपारीक भारतीय संस्कारांपेक्षा वेगळे नव्हतेच कधी. फ़क्त त्याचा उपयोग राजकिय-सामाजिक स्तरावर करण्यात लोकं कचरत होती. एकदा संघटन मिळाले तेव्हा लोकं आपोआप बाहेर पडलीत.

गांधींचं मुख्य कार्य हे संघटन बनवुन लोकांना सामर्थ्य देण्यात होतं. पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्यचळवळ की गांधीवादाने लढली गेली किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत गांधीवादी मार्गाने गेला.

गांधी हा एक महान तत्ववेत्ता आहे असं कधी त्यांच्या अनुयायांनीही मानलेलं नाही. जेव्हढं पटतं तेव्हढंच घेतलं. पण पटत नाही म्हणुन त्यांचा तिरस्कार कोणीही केला नाही. उलट त्यांच्या मतांचा आदरच लोकांनी केला. गांधी हा धर्माचा सच्चा ’फ़ॉलोवर’ असाच त्याचा अर्थ होता


- शैलेंद्र पाटील

-------
 

Thursday, March 8, 2012

सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना

] सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.

२] सावरकर ब्रिटीश सैन्यभरतीत मदत करत होते. तरीही २.५ लाख ते २५ लाख इतक्या प्रमाणात झालेल्या भरतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता हे विधान चुकीचे आहे.

३] आझाद हिंद सेनेविरुद्ध कुठली बटालियन लढत होती हा मुद्दा गैरलागु आहे...कारण सैन्याची उपलब्धता वाढल्याने कोणाला कुठे पाठवावं हा ऑप्शन ब्रिटीशांकडे होता. तेव्हा ब्रिटीश सैन्यभरतीमुळे आझाद हिंद सेनेचा फ़ायदा होणार होता हा मुद्दा हास्यास्पद आहे.

४] सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिस्ट-सोशलिस्ट विचाराचे होते, आणि त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. म्हणुनच कॉग्रेस अंतर्गत असलेल्या समाजवादी गटातुन त्यांना पाठींबा मिळणे बंद झाले. ह्यात गांधीगटाचे राजकारण एव्हढेच की त्यांनी ह्या स्थितीचा फ़ायदा उचलला व कार्यकारणीत सुभाषचंद्रांना एकाकी पाडले. राजकारण ही काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही.

५] पहिली आ्झाद हिंद सेना ही जपान्यांच्या हेतुंबद्दल संशय निर्माण झाल्याने तुटली होती. त्याचे नेते मोहन सिंग हे नंतर आझाद हिंद सेनेत कधीही परतु शकले नाही...जपान्यांनी ते होऊ दिलं नाही.

६]रासबिहारींच्या नेतृत्वाला सेना जुमानत नव्हती आणि म्हणुन सुभाषचंद्रांकडे संपुर्ण नेतृत्व गेलं. लीगचंही आणि सेनेचेही. तरीही ४० हजारांपैकी फ़क्त १२ हजार सैन्य दुसऱ्या आझाद हिंद सेनेत परत आलं.

७] ब्रिटीश इंडियन आर्मीचं स्ट्रक्चर पाहता ते धार्मिक नव्हे तर भाषिक/भौगोलिक/वांशिक आधारावर होती. त्यात हिंदु मुस्लिम असा विचार करुन आधीच फ़ाळणी होणार हे गृहित धरुन हिंदु सैन्याची भरती करायला सावरकर सरसावले ही कमालीच्या दुरदृष्टीची गोष्ट होती. कारण निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर १९४० साली मुस्लिम लीगने पाकिस्तानची भुमिका अधिकृतपणे जाहीर केली. सावरकरांनी मात्र याआधीच सैन्यभरतीला सुरुवात केली होती.
-----

तेव्हा हिंदु मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असे प्रकार होते. हिंदु मतदारसंघात फ़क्त हिंदु मतं देणार आणि मुस्लिम मधे फ़क्त मुस्लिम.

मुस्लिम मतदारसंघातही कॉंग्रेसने संपुर्ण स्वीप केला होता.

जीना, सावरकर प्रभुतींचे राजकारणातील स्थान नगण्य होते.
मुस्लिम लीगशी हिंदु महासभेने युतीदेखील केली होती.

सुभाषचंद्र बोस यांना झटपट सत्ता हवी होती. त्यांची राजकारणातली प्रगती काही स्वत:च्या जीवावर होती का?
देशबंधु चित्तरंजन दास, मोतीलाल नेहेरु ह्या स्वराज्य पार्टीच्या अपयशानंतर त्यांच्या चेल्यांनी म्हणजे नेहेरु-बोस इत्यादींनी समाजवादाचा डोस कॉंग्रेसला दिला आणि स्वत:चे स्थान समाजवादी लाटेत मजबुत करुन घेतले.

व्यक्तीगत कारणांमुळे नेहेरुंना ह्याकाळात कॉंग्रेसी राजकारणात फ़ारसे लक्ष देता येत नसे. नेहेरु-बोस ही समाजवादी जोडगोळीपैकी बोस ह्यांच्याकडे आपोआपच कॉंग्रेसचे नेतृत्व गेले.

गांधीगट ह्या राजकारणात बराच मागे पडला होता. सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत इत्यादी मंडळींना डावलुन निर्णय घेणारे सुभाषचंद्र नंतर जर्मन दुतावासाच्या संपर्कात आले. कधी एकदा सत्ता हाती येते असं समाजवादी मंड्ळींना झालं होतं.


समाजवादी कार्यकर्ते कितीही वाढले तरी कॉंग्रेसचा हुकुमी एक्का गांधीच होते. त्यांच्या संमतीशिवाय कार्यकारणीचे कुठलेही निर्णय होऊ शकणार नाहीत असा ठराव कार्यकारणीमधे पटेल, पंत प्रभुतींनी पास करुन घेतला. सुभाषचंद्रांचा सर्वात मोठा पराभव तोच होता. त्यांच्याच समाजवादी साथींनी त्यांना दगा दिला.

राजकीय हाराकिरी करुन सुभाषबाबु राजीनामा देऊन बसले. मग समाजवाद्यांचे कडबोळे बनवायचा प्रयत्न. जर्मनीने रशियावर हल्ला केल्याबरोबर ह्या कडबोळ्यातुन मार्क्सिस्ट बाजुला झाले. सुभाषबाबुंना नव्या मित्रांची गरज पडली. राजकारणातले सगळे दोर कापले गेले होते. त्यांचे पलायन, आझाद हिंद सेनेची स्थापना, जपानची मदत ह्या सगळ्या गोष्टींमागे सर्वात आधी सत्ता काबीज करायचीच इर्षा होती. ह्याच सत्तास्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांचा काटा काढला असावा. हाच प्रतिस्पर्धी पुढे गांधी-पटेल प्रभुतींचा गेम करुन भारताचा सत्ताधीशही झाला.

सावरकर ह्या संपुर्ण राजकारणातले एक छोटेसे खिलाडी होते.

------------

सुभाषचंद्र बोस यांचे राजकारण पहिल्यापासुनच गटबाजीचे होते. समाजवादी कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांचा आणि नेहेरुंचा मोठा वाटा होता. ह्याच समाजवाद्यांच्या जोरावर ते अध्यक्षपदी येऊ शकले. पहिल्यांदा सर्वसहमती होती कारण त्यांचे राजकारण अजुन कोणाला नीटसे कळले नव्हते.

अध्यक्षपदावर येताच त्यांनी जर्मन दुतावासाची संपर्क साधायला सुरुवात केली. त्याआधी केलेल्या युरोप दौऱ्याने ते फ़ॅसिझ्म आणि कम्युनिझ्ममुळे इतके प्रभावित झाले होते की कॉंग्रेसला त्यांनी त्याच वळणाने न्यायचा प्रयत्न सुरु केला. आणि अर्थात हे सगळं ज्यांनी कॉंग्रेस संघटना ज्यांनी उभी केली होती त्या गांधीगटाला अंधारात ठेऊन.

पुढची निवडणुकही सुभाषचंद्रांनी जिंकली कारण कॉंग्रेस अध्यक्ष हाच मतदारयादीही बनवतो. आजही कॉंग्रेस अध्यक्षाला हरवणं अशक्य आहे. सिताराम केसरी शरद पवारांना ५००० विरुद्ध ९०० अशा मतांनी हरवु शकतात कारण केसरी लोकप्रिय आहेत म्हणुन नाही.

बरं निवडणुक जिंकल्यावर कार्यकारणीमधे गोविंद वल्लभ पंतांनी गांधींना व्हेटो द्यायचा ठराव मांड्ला. सुभाषबाबुंच्या विरोधानंतरही कार्यकारणीतल्या सगळ्या समाजवाद्यांनी गांधींना व्हेटो द्यायला पाठींबा दिला.
ह्यापेक्षा मोठी हार ती काय असते? सुभाषचंद्रांनी राजीनामा दिला.

सुभाषभक्ती बाजुला ठेऊन पुर्ण घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की सुभाषचंद्रांची राजकिय अपरिहार्यता होती म्हणुन त्यांनी आझाद हिंद सेना वगैरेंचा खटाटोप केला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोकं सरदार पटेलांना हिरो मानतात तेच लोकं सुभाषचंद्रांच्या कार्यकारणीतील पराभवाचे प्रमुख सुत्रधार सरदार पटेल हेच होते हे विसरतात.

राजकारणात नेहेमी गट असतात. कोणी जिंकतो कोणी हारतो. त्यात हिरो-व्हिलन नावाचा प्रकार नसतो. सुभाषचंद्र बोस हे काही हिरोही नव्हते आणि व्हिलनही. देशभक्ती, स्वातंत्र्य हे केवळ राजकारणातले मुद्दे होते तत्कालीन नेत्यांसाठी.

---------------

विचारसरणीमुळे इतिहास बदलत नसतो....काही विचारसरणीचे लोकं मात्र इतिहासाला आपल्या विचारसरणीनुसार वाकवायचा प्रयत्न करतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावरकर स्वत:च..जे भारताला सनातन काळापासुन राष्ट्र मानतात...त्यासाठी सोयीस्कर संदर्भ देतात..सोयीस्करपणे अनेक बाबींकडे दुर्लक्ष करतात.

सावरकरवाद्यांचंही हेच चाललंय आता.

दुसऱ्या महायुद्धात झालेली सैन्यभरती काय सावरकरांमुळेच झाली फ़क्त? ब्रिटीश सरकार अतोनात प्रयत्न करत होतं त्यासाठी सोबतीला कम्युनिस्ट, मुस्लीम लिग होतेच...नोकरीसाठी अनेक जण त्याकाळातही उत्सुक होतेच. महायुद्धापुर्वी फ़क्त अडीच लाख भारतीय सैन्य होतं....महायुद्धानंतर ते २५ लाख होतं.

आझाद हिंद सेना मात्र ४५ हजारांच्या पुढे कधी जाऊ शकली नाही.

कोणी कोणाची किती मदत केली? 

-------------

१] महायुद्धापुर्वीचं सैन्य : २.५ लाख
महायु्द्धानंतरचं सैन्य: २५ लाख.

असं गृहित धरा कि सावरकरांमुळेच हि सगळी सैन्यभरती झाली (बाकी इतक्या प्रमाणात भरतीसाठी ब्रिटीश सरकार, जीना, कम्युनिस्ट वगैरेंना फ़ारसे यश नसते मिळाले सावरकर नसते तर).

आझाद हिंद सेनेतले सगळे ४५ हजार सैन्यदेखील सावरकरांनीच पुरवले असंही मान्य करुयात (वादासाठी).

आझाद हिंद सेनेला ४५ हजार आणि ब्रिटीशांना २२.५ लाख सैन्य उभारण्यात मदत केलेल्या सावरकरांना ह्या दोघांच्या लढाईत कोण जिंकावे असं वाटत असेल?
आझाद हिंद सेना? आझाद हिंद सेनेला जर जिंकवायचे होते तर ब्रिटीशांना इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्यभरतीला मदत का करावी?

२] ४५ हजार सैन्यानिशी ब्रिटीशांना पराभुत करत आझाद हिंद सेनेने इंफ़ाळ पर्यंतची मजल मारली होती ह्यावर जर कोणाचा ’विश्वास’ असेल तर त्याला काय म्हणावं हेच कळत नाही. जपानी सैन्य काय फ़क्त गंमत बघायला बरोबर होतं? जपानी सैन्य किती होतं ह्याचा आकडा आहे कुणाकडे?

-----------------

आझाद हिंद सेनेची निर्मीती
मोहन सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना ही प्रथम इंडियन इंडिपेंडन्स लीगची सैनिकी शाखा म्हणुन स्थापण्यात आली होती. त्यात ४० हजार सैन्य होते जे सगळे जपानचे प्रिझनर्स ऑफ़ वॉर होते.

इंडियन इंडिपेंडन्स लीगचे मुख्य नेते रासबिहारी बोस होते.

तीन महिन्यातच मोहन सिंग ह्यांना जपान्यांच्या हेतुंवर शंका येऊ लागली. रासबिहारींशी त्यांचे ह्याबाबत मतभेद झालेत. आणि त्याची परिणीती मोहन सिंग ह्यांच्या हकालपट्टीत झाली. बहुतेक सैनिकांनी सेनेचा त्याग करुन प्रिझनर्स ऑफ़ वॉरचे स्टेटस पुन्हा घेतले.

ही सगळी पडझड रोखण्यासाठी जपान्यांनी सुभाषचंद्र बोसांकडे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेना ह्या दोघांचे नेतृत्व सोपवले. बरेचसे लोक परतले. सुरुवात झाली १२००० सैन्याने. पुढे आणखी पुर्वाश्रमीचे सैनिक आणि सिव्हिलियन मिळून आणखी २८-३० हजार सैन्य जमवले गेले. एकुण संख्या ४० हजारांच्या आसपास होती. फ़ार फ़ार तर ४५०००. ह्या संख्येमधे फ़ारशी भर नंतर पडतांना दिसली नाही.

आझाद हिंद सेनेमधेही हिंदु-मुस्लिम असा भेदभाव नव्हता. सेनेच्या दोन सैनिकी डिव्हिजन्स होत्या. एकाचं नेतृत्व मोहम्मद जमान कियानी आणि दुसरीचं नेतृत्व अझीझ अहमद ह्यांच्याकडे होते.

पहिल्या डिव्हिजनच्या चारपैकी दोघांचं म्हणजे गांधी रेजिमेंटचे नेतृत्व हे इनायत कियानी आणि सुभाष रेजिमेंटचे नेतृत्व हे शहानवाझ खान ह्यांच्याकडे होते.
 -----------

सुभाषचंद्र बोस हे फ़ॅसिझम चे उघड समर्थक होते. १९३० साली मेयरपदी निवडुन आलेल्या भाषणापासुन ते १९४४ साली केलेल्या टोकियोतील भाषणापर्यंत त्यांना फ़ॅसिझ्म प्रिय होता.

त्यांनी निर्माण केलेल्या सोशलिस्ट आघाडीला कम्युनिस्ट सोडुन गेले कारण जर्मनीने रशियावर केलेला हल्ला. जितके कम्युनिस्ट रशिया धार्जिणे होते तितकेच सुभाषबाबु जर्मनधार्जिणे. 

फ़ॅसिझ्म आणि सुभाषचंद्र
As early as 1930 -- in his inaugural speech as mayor of Calcutta -- the fervent young Bose first expressed his support for a fusion of socialism and fascism:

“... I would say we have here in this policy and program a synthesis of what modern Europe calls Socialism and Fascism. We have here the justice, the equality, the love, which is the basis of Socialism, and combined with that we have the efficiency and the discipline of Fascism as it stands in Europe today.”

in late 1944 -- almost a decade-and-a-half later -- in a speech to students at Tokyo University, he asserted that India must have a political system "of an authoritarian character. . . To repeat once again, our philosophy should be a synthesis between National Socialism and Communism." 
फ़ॅसिझम वरुन नेहेरुंशी मतभेद
Bose went on to note that Nehru had said in 1933: "I dislike Fascism intensely and indeed I do not think it is anything more than a crude and brutal effort of the present capitalist order to preserve itself at any cost." There is no middle road between Fascism and Communism, said Nehru, so one "had to choose between the two and I choose the Communist ideal."

To this Bose responded:

“The view expressed here is, according to the writer, fundamentally wrong. . . One is inclined to hold that the next phase in world- history will produce a synthesis between Communism and Fascism. And will it be a surprise if that synthesis in produced in India?... In spite of the antithesis between Communism and Fascism, there are certain traits in common. Both Communism and Fascism believe in the supremacy of the State over the individual. Both denounce parliamentary democracy. Both believe in party rule. Both believe in the dictatorship of the party and in the ruthless suppression of all dissenting minorities. Both believe in a planned industrial reorganization of the country. These common traits will form the basis of the new synthesis. That synthesis is called by the writer "Samyavada" -- an Indian word, which means literally "the doctrine of synthesis or equality." It will be India's task to work out this synthesis.”


--------------------


२२ जून १९४० रोजी सावरकर-सुभाषचंद्रांची भेट होण्यापूर्वी जवळजवळ १ वर्ष आधीपासून म्हणजे जुलै १९३९ मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर परदेशी जाण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यांना रशियात जायचं होतं. त्यामुळे १९४० च्या आरंभी त्यांनी बंगाल आणि पंजाब मधल्या निकटवर्ती मित्राबरोबर गुप्त रितीने देशातून निसटून रशियात कसे जाता येईल याबद्दल चर्चाही केली होती. मेजर जनरल शहानवाज खानांच्या आठवणीनुसार सुभाषचंद्रांनी गांधीजींसोबत आपल्या योजनेची चर्चा केली होती. युद्धकाळात इंग्रजांच्या तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा काही भारतीय पुढा-यांनी हिंदूस्थानातून निसटून जावे, इंग्रजांच्या शत्रूच्या मदतीने सैन्य उभारावं आणि हिंदुस्थान मुक्त करण्यासाठी यावं अशी कल्पना आपण गांधींसमोर मांडली होती असं सुभाषबाबूंनी शाहनवाझ खानांना सांगितलं होतं. (शाहनवाझ खान, माय मेमरीज ऑफ आयएनए ऍंड इट्स नेताजी, पृ.१७)

सुभाषचंद्रांनी सावरकरांना भेटणं हे तत्कालीन राजकारणाचा भाग होता. सुभाषचंद्र कॉंग्रेस सोडुन गेल्यावर लोकं गोळा करतच होते. त्यात त्यांनी सावरकर, जीना प्रभुतींची भेट घेणं स्वाभाविक आहे.

तेव्हा सावरकरांच्या गंभीर सूचनेमुळेच क्रांतिकार्याची धुरा अंगावर घेण्याची कल्पना नि स्फूर्ती सुभाषचंद्रांना झाली असली पाहिजे, हा समज सावरकर भक्तांनी दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे.