सुभाषचंद्रांना गांधींनी उघडपणे विरोध केला. काही लपवाछपवी त्यात नव्हती. समाजवादी गट कॉंग्रेसमधे बळकट होत होता. कॉंग्रेस-अंतर्गत समाजवादी कॉंग्रेस १९३४ ला स्थापन झाली होती. १९३८ पर्यंत यात हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी, अनुशीलन समिती, गांधीवादी सोशलिस्ट (लोहिया-पटवर्धन), मार्क्सवादी समाजवादी (जे.पी.), फ़ेबियन समाजवादी (मनु मसानी) हे सगळे येत होते. सुभाष बोस आणि नेहरु यांचा ह्या गटाच्या जीवावर कॉंग्रेस काबीज करायचा प्लान होता. ह्याच गटाच्या जीवावर १९३८ साली सुभाषबाबु कॉंग्रेस अध्यक्षही झाले. पण कॉंग्रेसवर स्वत:ची मते लादु लागले. १९३६ च्या युरोपिअन टुरने त्यांना फ़ॅसिझ्म आणि सोशलिझ्म यांना मिक्स करायचा फ़ॉर्म्युलाच जणु सापडला होता. अध्यक्षपदावर असुनही जर्मनीच्या राजदुताशी गुप्तवार्ता ते करत होते.
१९३९ साली सुभाषचंद्र बोस पुन्हा अध्यक्षपदी निवडुन आले (कॉंग्रेसचा अध्यक्षच मतदार निवडतो, त्याला हरविणे अशक्य असते, वरुन समाजवादी कॉंग्रेस पाठींबा द्यायला होतीच).
पण १९३९ सालीच झालेल्या त्रिपुरी अधिवेशनात कॉंग्रेसच्या विषय समितीमधे गोविंद वल्लभ पंत यांनी कार्यकारणी निवडीवर गांधींना व्हेटो (नकाराधिकार) द्यायचा ठराव मांडला. म्हणजे गांधींच्या approval शिवाय कार्यकारणी निवडता येणार नाही. हा ठराव मात्र पास झाला. कारण सोशलिस्ट कॉंग्रेसमधे पडलेली फ़ुट. नेहरुवादी आणि सुभाषवादी असे दोन गट यात पडले. नेहेरुवाद्यांनी पंतांच्या ठरावाला पाठींबा दिला. ही सुभाषचंद्रांची राजकीय हार होती. म्हणुन त्यांनी राजीनामा दिला.
समाजवादी कॉंग्रेसमधे फ़ुट पडली. त्रिपुरी कॉंग्रेसनंतर लगेच दिल्ली येथे समाजवादी कॉंग्रेसची सभा भरविण्यात आली, त्यात अनुशीलन समीतीच्या लोकांनी जयप्रकाश नारायणांवर धोका दिल्याबद्द्ल खुप टिका केली.
सुभाष चंद्रांनी फ़ॉरवर्ड ब्लॉकची घोषणा केली. याचे मुख्य उद्दिष्ट होते डाव्या विचारसरणीच्या पक्षांचे एकिकरण. पण त्यात अनुशीलन समितीचे लोकंही आले नाहीत कारण ते सोशलिस्ट असले तरी फ़ॅसिझ्म त्यांना मान्य नव्हते.
मग सुभाषचंद्रांनी त्याच वर्षी (म्हणजे १९३९ साली) left consolidation committee (डावे एकिकरण समिती)ची घोषणा केली आणि त्यात फ़ॉरवर्ड ब्लॉक, समाजवादी कॉंग्रेस (दोन्ही अनुशीलन समिती गट आणि जेपी गट), कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ इंडिआ, रॅडिकल डेमोक्रॅटीक पार्टी (मानवेंद्रनाथ रॉय यांची), मजुर पक्ष, किसान सभा ह्या सर्वांना निमंत्रित केले गेले.
पण १९४० पर्यंत ही एकीकरण समिती तुटली. वैचारिक मतभेदांमुळे कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ इंडिआ, रॅडिकल डेमोक्रेटीक पार्टी आणि समाजवादी कॉंग्रेसचा जेपी गट हे सगळे सोडुन गेले.
मग इतरांची सुभाषबाबुंनी रामगढ, झारखंड येथे anti-compromise conference (१९४०) बोलवली. त्यात दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीवर काहीही कॉम्प्रोमाइज करणार नाही असा ठराव मांडला. ह्यास सभेत समाजवादी कॉंग्रेसमधील अनुशीलन समिती गटाने अधिकृतपणे समाजवादी कॉंग्रेस सोडायचा निर्णय जाहीर केला. पण त्यांनी सुभाषचंद्रांच्या फ़ॉरवर्ड ब्लॉकमधे न जाता, स्वत:चाच Revolutionary socialist party (Marxist-Leninist) हा पक्ष बनविला.
त्यातच फ़ॅसिस्ट जर्मनी आणि सोशलिस्ट रशिया यांचा युद्ध न करायचा करार हिटलर ने तोडला. जर्मनीने रशियावर आक्रमण केले. मग तर जर्मनीविरोधात मित्र राष्ट्रांना सपोर्ट द्यायची उघड भुमिका सगळे डावे पक्ष घेऊ लागले. Revolutionary socialist party (Marxist-Leninist) ह्या पक्षानेही सुभाषचंद्रांची बाजु सोडुन नवीन भुमिका घेतली की रशियाचे समर्थन केले पाहिजे ( आणि भारतात मात्र ब्रिटीशांना विरोध करावा).
ह्या सगळ्या घडामोडीत सुभाषचंद्रांची डाव्या आघाडीच्या माध्यमातुन सत्ता मिळवायची शक्यत मावळत होती. मग त्यांनी फ़ॅसिस्टांच्या मदतीने भारताबाहेर जावुन लष्कराच्या सहाय्याने सत्ता मिळवावी म्हणुन भारत सोडला. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्याबद्दल अधिक लिहित नाही.
- shailendrasinh